हिमायतनगर| ओ.बी.सी. संघर्ष योध्ये प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्यावर केलेल्या प्रक्षोभक वक्तव्या प्रकरणी ओ.बी.सी. समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. समाजच्या भावना दुखावणारे मैसेज सोशल मिडियावर टाकून प्रा. लक्ष्मण हाके यांना मारण्याची धमकी देणाऱ्या माधव देवसरकर यांच्यावर कठोरातील कठोर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सकल ओबीसी समाजाच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
माधव देवसरकर यांनी सोशल मिडीयावर संघर्ष योध्ये तथा ओ.बी.सी. आरक्षणाचे कट्टर समर्थक संविधानीक मार्गाने उपोषण करणारे प्रा. लक्ष्मण हाके यांच्यावर २ दिवसापूर्वी अतिशय खालच्या भाषेत म्हणजे लक्ष्मण हाके तू हरामखोरा, दलाला तू सरकार कहून पैसे घेवून उपोषणास बसतोस, तू निच्छ आहेस, तुझी लायकी नाही, तू मराठा आणि ओबीसी मध्ये वाद घोलतोस, याद राख बेल्या, येत्या २ ते ४ दिवसात तुझा बोऱ्या बिसतारा गुंडाळतो की नाही तू बघ, तू त्या छगन भुजबळ व धनंजय मुंडे यांच्या पैशावर जोर मारतोस ना. तुझा येणाऱ्या काळात जितेंद्र आव्हाड करतो आणि आणि दिल्या ठिकाणी तुला ठेकल्याशिवाय राहणार नाही.
अशा गलिच्छ भाषेत शिवीगाळ केल्यामुळे सकल ओ.बी.सी. समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. अशा भावणा दुखविण्याचे वक्तव्य करून समाजामध्ये द्वेष, हिंसा पसरविण्याचे कटकारस्थान त्यांच्याकडून झाले आहे. अशा प्रकारच्या धमक्या देवून हिमायतनगर-हदगाव तालुक्यातील प्रा. लक्ष्मण हाके यांच्यावर प्रेम करणाऱ्या व मानणाऱ्या सकल ओ.बी.सी. समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी माधव देवसरकर यांच्यावर कठोरातील कठोर गुन्हा दाखल करुन गुन्ह्याची नोंद घ्यावी. येणाऱ्या काळात त्यांच्याकडून असे अक्षेपार्ह वक्तव्य होणार नाही अशी कबुली लिहून घ्यावी. अशी मागणी हिमायतनगर व हदगाव तालुक्यातील सकल ओ.बी.सी. समाज बांधवाकडून पोलिसांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. या निवेदनावर बाबाराव जर्गेवाड, दिलीप आला राठोड, सुनील चव्हाण, नागेश शिंदे आदींसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.