लोहा| गणपती बाप्पा मोरया ..…. चा गजर भक्तीभावाने जसा सर्वत्र सुरू आहे. तसाच तो अमेरिकेतही सुरु असतो. त्या देशात भारतीय विशेषतः महाराष्ट्रीय एकत्रित येवून त्यांनी गणरायाची सार्वजनिक व घरगुती प्राणप्रतिष्ठा केली आहे. लोह्याचे भूमिपुत्र व केरबाजी बिडवई याचे धाकटे बंधू वनविभागाचे सेवानिवृत्त उपसंचालक गोविंदराव बिडवई अमेरिकेत सध्या वास्तव्याला असून, त्यानी अमेरिकेतील गणेशोत्सव भारतीय विशेषतः महाराष्ट्रीय एकत्रित येऊन हा उत्सव साजरा करतात. या उत्सवाच्या अनुषंगाने त्यांनी अनुभव सांगितले.
लोह्याचे भूमीपूत्र वनविभागाचे सेवा निवृत उपसंचालक गोविंदराव बिडवई गेल्या चार महिण्यापासून अमेरिकेत त्याचा मुलगा स्वॉप्टवेअर इंजिनिअर प्रसाद यांच्याकडे सॅन होजे येथे सध्या आहेत. तेथील गणेशउत्सवा’ बाबत ते अभिमानाने सांगतात. भूमिपूत्र सेवानिवृत उपसंचालक गोविंदराव बिडवई त्यांच्या पत्नी जयश्री बिडवई या गणेशोत्सव काळात मुलांकडे आहेत. जेष्ठ नेते केरबाजी बिडवई, गोविंदराव बिडवई, या परिवारातील अनेक जण अमेरिकेत आहेत .लक्ष्मीकांत बिडवई, शशिकांत बिडवई राहुल बिडवई यांनी सांगितले की गोविदराव बिडवई (काका) याची मुलगी आरती जावई डॉ. सचिन नुनेवार हे शिकागो शहरात राहतात .मुलगा स्वाप्टवेअर इंजि.प्रसाद बिडवई, प्रांजली प्रसाद बिडवई हे सॅन होजे येथे नौकरीला आहेत. राहुल बिडवई याची बहीण इजि रेश्मा व भाऊजी इजि गौतम माशेट्टीवार, तसेच धाकटी बहीण रुपाली व भाऊजी इंजि स्वप्नील निलावार हे टॅम्पा फ्लोरिडा येथे नौकरील व वास्तव्याला आहेत ही बाब या भूमीसाठी अभिमानाची हाय.
लोह्याचे भूमिपुत्र गोविंदराव बिडवई हे सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. अमेरिकेत गणेश उत्सव बाबत त्यांनी सांगितले की, या देशात श्रीगणेश उत्सव हा धूमधडाक्यात साजरा करतात. भारतीय विषेशतः महाराष्ट्रीय परिवार गणेश उत्सवा निमीत्य एकत्रित येतात गणेश मुर्ती स्थापना आपआपल्या घरात करतात व मित्रमंडळीना त्यांच्या घरी प्रसादासाठी बोलावतात जेवन देतात, सर्व मित्रमंडळीना सोबत घेवू श्रीगणेशाची आरती मनोभावे करतात कौटुंबिक व सामाजिक उत्सव भक्तिमय वातावरणात आनंदाने करतात.
या देशातील वेगळ्या शहरात मंदिरात गणेशाच्या मुर्तीची स्थापना करतात. त्यावेळी ढोलताशा लेझीम तसेच भावगीत गायिले जातात महाराष्ट्रीय मंडळी उत्साहाने भाग घेतात. गणेश मंडळात रोज धार्मिक , सांस्कृतिक, वेद पठणाचे, विविध कार्यक्रम ठेवता असा प्रकारे श्रीगणेश उत्सवाचा कार्यक्रम मोठ्या भक्तीभावाने होत असतो.
बिडवई हे सध्याला अमेरीकेतीवर कॅलीफोनिया राज्यातील सॅन होजे शहरात चिरंजीव इंजि. प्रसाद सोबत आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलगा प्रसाद, स्नुषा प्रांजली यांनी श्री गणेशाची स्थापना घरी केली आहे. या भागातील आपले महाराष्ट्रीय बोलावून आरती केली जाते. प्रसाद दिला जातो तसेच इतरही आपल्या राज्यातले लोक येथे गणरायाची पूजाअर्चा करत असतात. त्यात खूप गोडवा व आनंद वाटतो. मुलींकडे तसेच माझ्या दोन पुतणी आहेत. त्याच्याकडे मी व माझी पत्नी जयश्री आम्ही उभयतानी महालक्ष्मी सणाच्या निमित्ताने जाऊन गणरायाचे दर्शन घेऊन आलो. असा अनेक प्रसंग अमेरिकेतील गणेशोत्सव कार्यक्रम आनंदी वातावरणात साजरा होतो असे गोविंदराव बिडवई सांगतात.