नवीन नांदेड,रमेश ठाकूर। भक्तांचा नवसाला पावणारा गणपती म्हणून सिडको परिसरातील मुख्य रोडवर असलेल्या मुख्य बाजारपेठेतील सत्यगणपती असून भक्तांचा व कार्यकारी मंडळ यांच्या संकल्पनेतून मंदिर परिसर कायापालट झाला असून वर्ष भर दैनंदिन धार्मिक कार्य चालूच असून गणेशोत्सव काळात दिवसभर दर्शन साठी गर्दी होत आहे.
सिडको मुख्य बाजारपेठेतील व मुख्य मार्गावर असलेल्या सत्यगणपती असल्याची भावना व मनोकामना भाविक भक्तांत होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मंदिरात पुजारी म्हणून शामराव लक्षणमराव लाठकर हे नित्य नियमाने दैनंदिन सकाळी व सायंकाळी पुजा पाठ आरती करत असत तर विनायक व संकष्ट चतुर्थी निमित्ताने व मंगळवारी भाविक भक्तांनी केलेल्या मनोकामना व नवस करून त्या बोलेल्या अनेक कामी, शुभ विवाह, यासह अनेक भाविक भक्तांचा ईच्छा पुरण झाल्या आहेत.
सात मंगळवार किंवा २१ मंगळवार नित्य नियमाने महाआरती केल्यास भाविक भक्तांचा ईच्छा पुरण होतात असा कयास आहे आता पर्यंत मंदीर देवस्थनाला भाविक भक्तांनी केलेल्या आर्थिक सहकार्य व मंदीर देवस्थान कार्यकारी मंडळ अध्यक्ष संजय कदम, उपाध्यक्ष दिपक टाक, बकंट गगड, सचिव गिरिधर मैड, शाम महाजन व संचालक मंडळ यांनी घेतलेल्या भुमिकेने मंदिर परिसरात कायापालट झाला आहे.
या सत्यगणपती मंदीरात नांदेड शहर व सिडको हडको परिसरातील भाविक भक्तांसह ग्रामीण भागातील भाविकांना हा गणपती पावला असुन मोठया प्रमाणात भाविकांनी गर्दी केली आहे. गणेशोत्सव काळात दैनंदिन महा अभिषेक व महापूजा, सकाळ संध्याकाळ महाआरती यासह विविध धार्मिक कार्यक्रम रेलचेल चालू आहे. परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात दर्शन आरती करण्यासाठी गर्दी केली आहे.