HomeनांदेडMarkets closed on polling days : मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद...

Markets closed on polling days : मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद -NNL

नांदेड| लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्‍या दिवशी बुधवार, 20 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्‍ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्‍याचे आदेश मार्केट अॅंड फेअर अॅक्‍ट 1862 चे कलम 5 अन्‍वये जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा‍दंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत.

लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी नांदेड जिल्‍ह्यातील 83-किनवट, 84-हदगाव, 85-भोकर, 86-नांदेड उत्‍तर, 87-नांदेड दक्षिण, 88-लोहा, 89-नायगाव, 90-देगलूर व 91 – मुखेड या नऊ विधानसभा मतदार संघात बुधवार 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. त्‍याअनुषंगाने पणन संचालक, महाराष्‍ट्र राज्‍य, पुणे यांनी मतदान व मतमोजणी दिनांकास जिल्‍ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्‍यास आदेशित केले आहे.

बुधवार 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार भरणाऱ्या गावांची ठिकाणाची नावे पुढीलप्रमाणे आहेत. तालुका हदगाव-मनाठा, किनवट-माळ बोरगाव, मांडवी, माहूर-मौ.दहेगाव, अर्धापूर-कामठा, धर्माबाद-निरंक, नायगाव-सोमठाणा, देगलूर-शहापूर, मरखेल, बिलोली-सगरोळी, मुखेड-जाहुर, दापका गु. , सावरगाव पिर, नांदेड- मौ. वाडी अंतर्गत छत्रपती चौक ते डी मार्टपर्यत , मौ. तरोडा बु. व खु (तरोडा नाका), मुदखेड-निरंक, भोकर-निरंक, हिमायतनगर-हिमायतनगर शहर, उमरी-निरंक, लोहा-सोनखेड, उमरा, कंधार-मौ. बारुळ या ठिकाणची आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्‍हणजे गुरुवार 21 नोव्हेंबर 2024 रोजी भरविण्‍यात यावेत. तसेच मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी परिसरात आठवडी बाजार भरत असल्यास याच आदेशान्वये ते बंद करण्यात येत असून हे आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी भरविण्यात यावेत असे आदेश निर्गमित केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments