Markets closed on polling days : मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद -NNL
नांदेड| लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या दिवशी बुधवार, 20 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश मार्केट अॅंड फेअर अॅक्ट 1862 चे कलम 5 अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत.
लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी नांदेड जिल्ह्यातील 83-किनवट, 84-हदगाव, 85-भोकर, 86-नांदेड उत्तर, 87-नांदेड दक्षिण, 88-लोहा, 89-नायगाव, 90-देगलूर व 91 – मुखेड या नऊ विधानसभा मतदार संघात बुधवार 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी मतदान व मतमोजणी दिनांकास जिल्ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्यास आदेशित केले आहे.
बुधवार 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार भरणाऱ्या गावांची ठिकाणाची नावे पुढीलप्रमाणे आहेत. तालु...
