देगलूर/नांदेड। “ऑपरेशन फ्लॅश आऊट” नुसार अवैध धंदयावर कार्यवाही करणेकामी मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी पोलीस निरीक्षक देगलुर यांना आदेशीत केले होते, त्यानुसार श्री. मारोती मुंडे पोलीस निरीक्षक यांनी पो.स्टे. देगलुरचे गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना अवैध धंदयावर कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले.


त्यावरून दिनांक ०९/०९/२०२४ रोजी गोपणीय माहितीगार यांनी दिलेल्या माहितीवरून एक काळया रंगाची युनिकॉर्न मोटार सायकल क्र.MH 26 BK 8957 वर दोन संशयित इसम बॅगमध्ये उदगीर रोडने देगलुर कडे येत असल्याने त्यांना देगलुर कॉलेजजवळ मेन रोडवर थांबवुन त्यांना विचारपुस करून त्यांचे जवळील बॅगची पाहणी केली असता मानवी आरोग्यास अपायकारक असलेला व महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधित पानमसाला व गुटखा मिळुन आल्याने त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव मो. मुजम्मील अब्दुल खालेक वय २८ वर्ष व्यवसाय व्यापार व मो. नोमान अब्दुल बारी वय १९ वर्ष व्यवसाय व्यापार दोघेही राहणार मन्याल गल्ली, इतवारा नांदेड असे सांगीतल्याने त्यांना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन देगलुर यांनी पो.स्टे. दाखल गु.र.नं. ४२४/२०२४ कलम १२३,२७४,२७५,२२३, ३(५) भा.न्या. संहीता सहकलम २६ (२), २७,३० (२) (अ),५९ अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अन्वये कार्यवाही करून आरोपीतांकडुन सुगंधित पानमसाला, गुटखा व त्याचेजवळील युनिकॉर्न मोटारसायकल असा एकुण १,२५,९७० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


सदरची कामगिरी मा. श्री. अबिनाशकुमार पोलीस अधीक्षक नांदेड, मा.श्री. सुरज गुरव अपर पोलीस अधीक्षक नांदेड, मा.श्री. संकेत गोसावी, उपविभागीय पोलीस अधिकारी देगलुर, मा.श्री. मारोती मुंडे पोलीस निरीक्षक पो.स्टे. देगलुर यांचे मार्गदर्शनाखाली नरहरी फड पोउपनि, पोहेकॉ मरगेवाड ६४७, पोकॉ/२६१३ साहेबराव सगरोळीगर, पोकों/१७८८ सुधाकर मरदोडे, पोकॉ/ २७८ शिवाजी आडबे, पोकॉ/ २८५१ वैजनाथ मोटरगे, पोकॉ/३२२१ विशाल अटकोरे यांनी पार पाडली. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी कौतुक केले आहे.




