Police action ; देगलुर पोलीसांनी गुटखा व पानमसाला बाळगणारे २ आरोपीतांना केली अटक -NNL
देगलूर/नांदेड। "ऑपरेशन फ्लॅश आऊट" नुसार अवैध धंदयावर कार्यवाही करणेकामी मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी पोलीस निरीक्षक देगलुर यांना आदेशीत केले होते, त्यानुसार श्री. मारोती मुंडे पोलीस निरीक्षक यांनी पो.स्टे. देगलुरचे गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना अवैध धंदयावर कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले.
त्यावरून दिनांक ०९/०९/२०२४ रोजी गोपणीय माहितीगार यांनी दिलेल्या माहितीवरून एक काळया रंगाची युनिकॉर्न मोटार सायकल क्र.MH 26 BK 8957 वर दोन संशयित इसम बॅगमध्ये उदगीर रोडने देगलुर कडे येत असल्याने त्यांना देगलुर कॉलेजजवळ मेन रोडवर थांबवुन त्यांना विचारपुस करून त्यांचे जवळील बॅगची पाहणी केली असता मानवी आरोग्यास अपायकारक असलेला व महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधित पानमसाला व गुटखा मिळुन आल्याने त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव मो. मुजम्मील अब्दुल खालेक ...
