नांदेड, अनिल मादसवार| अतिवृष्टी आणि नंतर आलेल्या पुरामुळे मराठवाड्यात उभ्या शेती पिकाचे आणि जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, शासनाने आपतग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी नांदेड, हिगोली जिल्हयात अनेक ठिकाणी अतीवृष्टी आणिपूरग्रस्त भागाच्या पाहणी नंतर केली.
मागच्या तीन-चार दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेती पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. चांगल्या भरात असलेले सोयाबीन, काढणीस आलेला मुग, उडीद, तसेच तुर, हायब्रीड ज्वारी ऊस, केळी यासह इतर शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी माती वाहून गेल्याने जमीन नापीक बनली आहे. अतीवृष्टीने नंतर आलेल्या पुरामुळे अनेक शहरात व गावात पाणी घुसल्याने घरांची पडझड झाली आहे. जीवनावश्यक वस्तुची नासाडी झाली आहे. अनेक परिवारांच्या समोर उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज दुपारी आमदार मोहन हंबर्डे तसेच काँग्रेस पदाधिकारी यांच्यासह नांदेड शहरातील पाकीजा नगर, बिलाल नगर, लक्ष्मी नगर, गौतम नगर, खडकपुरा भागात जाऊन , गोदावरीचे पाणी वस्तीत घुसून झालेल्या नुकसानीची पाहणी केली, पूरग्रस्तांशी संवाद साधला, त्यांना धीर दिला, प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशा सूचना दिल्या. अपदग्रस्तांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.
यावेळी नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मिर्झा फरदतुला बेग, नांदेड शहर काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल सत्तार, २१ शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, विलास को-ऑपरेटिव बँकेचे व्हा. चेअरमन समद पटेल, लोहा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शरद पवार, कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बालाजी पंडागळे, राहुल हंबर्डे, विठ्ठल पावडे दिलीपराव पाटील बेटमोगरेकर, अण्णासाहेब पवार, सतीश देशमुख, पप्पू कोंडेकर, तिरुपती कोंडेकर आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
त्यानंर माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी सचिन नाईक, हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव देसाई यांच्यासह हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातडोंगरगाव (पूल) येथे जाऊन शेती पिकाची तसेच, पुराने नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली. कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव (पूल) येथील निलाबाई बरगे यांच्या घरामध्ये पुराचे पाणी जाऊन मोठे नुकसान झाले. त्यांच्याशी व इतर सर्व नागरिकांशी आमदार देशमुख यांनी संवाद साधून त्यांना धीर दिला.
नुकसानग्रस्ताच्या सोबत काँग्रेस पक्ष कायम उभा आहे अशी ग्वाही दिली.
यावेळी कळमनुरीच्या नायब तहसीलदार डॉक्टर सीमा कांदे मंडळ अधिकारी शिल्पा सरकटे तलाठी विनोद ठाकरे वसमत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाराम खराटे शहराध्यक्ष अलीमुद्दीन शेख डोंगरगावचे सरपंच अभिजीत देशमुख एम.आर कॅतमवार, सुधीर सराफ सुरेश कांडलीकर, जे.के कुरेशी आदीसह काँग्रेसपक्षाचे विविध पदाधिकारी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. माजी मंत्री आमदार देशमुख यांनी माजी आमदार भाऊराव पाटील व काँग्रेस पदाधिकारी यांच्यासह हिंगोली नजीकच्या आझम कॉलनी तसेच सेनगाव तालुक्यातील हनागदरी येथे भेट देऊन अतीवृष्टीने नुकसान झालेली पाहणी केली, नागरीकांशी संवाद सांधला.