अर्धापूर| येथील नायब तहसीलदार शिवाजी बाळाजी जोगदंड यांचा स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रशस्तीपत्र देऊन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सन्मान केला.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियतकालमर्यादेच्या आत लोकसेवा दिल्याबद्दल अर्धापूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार शिवाजीराव जोगदंड यांनी केलेल्या उल्लेखनीय आणि प्रशसंनिय कार्याबद्दल नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनी प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा यथोचित्य सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी जिल्हाधिकारी महेश वडदकर आदींची यावेळी उपस्थिती होती. अर्धापूर येथील तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांनी नायब तहसीलदार शिवाजीराव जोगदंड यांचे अभिनंदन केले आहे.