नांदेडकृषी

Nanded due to heavy rains : नांदेडला अतिवृष्‍टी होवून झालेल्या नुकसानग्रस्तासाठी 812 कोटींची मागणी -NNL

नांदेड, अनिल मादसवार| नांदेड जिल्‍हयात एक ते तीन सप्‍टेंबर 2024 या कालावधीत 62 मंडळात अतिवृष्‍टी होवून शेतीपीक व शेतजमीन नुकसान झाल्‍याचा प्राथमिक अहवाल प्राप्‍त झाला. त्‍यानुसार नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनास सादर करण्‍यात आला आहे.

जिल्‍हा प्रशासनाकडून ग्रामस्‍तरीय समितीमार्फत नुकसानीचे संयुक्‍त पंचनामे करण्‍यात आले. राज्‍य शासनाकडून प्राप्‍त मान्‍यतेनुसार पीक नुकसान अनुदान वाटपाचे दर वाढविण्‍यात आले आहेत. तसेच अनुदान वाटपातील क्षेत्राची मर्यादा 2 हेक्‍टरवरून 3 हेक्टरपर्यंत करण्‍यात आली आहे. त्‍यानुसार ग्रामस्‍तरीय समितीमार्फत सदर नुकसानीचे संयुक्‍त पंचनामे पुर्ण झाले आहेत व निधी मागणी विभागीय आयुक्‍त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना सादर केली आहे.

9k 1 Nanded due to heavy rains : नांदेडला अतिवृष्‍टी होवून झालेल्या नुकसानग्रस्तासाठी 812 कोटींची मागणी -NNL

तालुका बाधित शेतकरी संख्या , एकूण बाधित क्षेत्र (हे.आर.), अपेक्षीत निधी (रक्कम कोटीत) पुढीलप्रमाणे आहे. नांदेड बाधित शेतकरी 34641 व बाधित क्षेत्र 21752 अपेक्षित निधी 29.85 कोटी रुपये, अर्धापूर -32448, 24245, 32.97, कंधार- 73650, 52402, 71.27, लोहा -80840, 61642, 84.40, बिलोली- 36099, 34169, 46.47, नायगांव- 56172, 41645, 56.64, देगलूर- 61123, 37462, 50.95, मुखेड- 79603, 41114, 55.92, धर्माबाद- 28795, 20042, 27.26, उमरी- 34038, 24042, 32.70, भोकर- 43059, 38308, 52.19, मुदखेड- 30812, 21584, 29.35, हदगांव- 74228, 60492, 82.27, हिमायतनगर- 34533, 32805, 44.61, किनवट- 57702, 59132.78, 80.42, माहूर- 26172, 25681.18, 35.12 असे एकूण 783915 बाधित शेतकरी आहे तर बाधित क्षेत्र हे.आर 596517.96 इतके आहे यासाठी अपेक्षित रुपये 812.386 कोटी निधीची मागणी करण्यात आली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!