हरडफ (प्रतिनिधी) भगवान गौतम बुद्धांच्या शांती, करुणा व प्रज्ञेचा संदेश समाजात रुजविणाऱ्या ५३ व्या धम्म मेळाव्याचे हरडफ येथे उत्साहात आयोजन करण्यात आले. न हिंसा, करुणा आणि शांती हाच बुद्धांचा धम्म असल्याचे प्रतिपादन यावेळी करण्यात आले. विचारांची आणि माणुसकीची ऊर्जा देणारा हा धम्म मेळावा समाजात मानवता व बंधुता नांदविणारा ठरला.

या प्रसंगी समाज मंदिराचे उद्घाटन (निधी ०९ लाख रुपये) तसेच सभामंडपाचे भूमिपूजन (निधी ४० लाख रुपये) अशा महत्त्वपूर्ण विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. या विकासकामांमुळे परिसरातील सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळणार आहे.


कार्यक्रमास संभाराव लांडगे (मा. जि. प. सदस्य), पंजाबराव पा. कदम (मा. जि. प. सदस्य), संदेश पा. हडसनीकर (युवा जिल्हाप्रमुख), बाबूसराव कदम (मा. प. स. सभापती), अशोकराव पवार, पी. के. कदम, प्रा. शिवाजी जाधव, रुपेश तंत्रे (सरपंच), शरद पा. हरडफकर, गणेशराव पिसाळ, आकांक्षा वायवळ, सौ. वाठोरे (सरपंच), मुनेश्वर नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित होते.



याशिवाय मुंबई व अकोला येथील सुप्रसिद्ध गायक, तसेच गावातील नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. धम्म मेळाव्याच्या माध्यमातून समाजात सकारात्मक विचार, समता व बंधुतेचा संदेश अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


