छत्रपती संभाजीनगर| छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजना, २० टक्के सर्वसमावेशक योजना व म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत १४९४ गाळे, सदनिका, निवासी भुखंडाकरिता फेब्रुवारी-२०२४ च्या जाहिरातीस अनुसरुन ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जाच्या संगणकीय सोडतीचा शुभारंभ गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते १६ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.
या सोडतीचे थेट छायाचित्रण यु-ट्युब या समाजमाध्यमावर प्रक्षेपित होणार असून उपरोक्त सोडतीचे प्रक्षेपण पाहण्याकरीता यु-ट्युब या समाजमाध्यमाची ऑनलाइन लिंक अर्जदारांच्या भ्रमणध्वनीवर लघुसंदेशाद्वारे (SMS) स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल, असे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मंदार वैद्य यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.