उस्माननगर l आपल्या देशाची भूमी ही वीरांची भूमी असून संत ज्ञानेश्वर , छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज , व भगवान बिरसा मुंडे यांनी अवघ्या पंचवीस वर्षात भारतीय स्वातंत्र्य संग्रामात झोकून देऊन इंग्रजांना सळो की पळो करून सोडले तसेच जल , जंगल , जमीन , हक्क अबाधित राहुन आदिवासी संस्कृतीसाठी संरक्षण व्हावे यासाठी बहुमोल कार्य केले,त्यांचा आदर्श तरूणांनी घ्यावे असे प्रतिपादन नांदेड येथील तहसीलदार संजय वारकड यांनी तेलंगवाडी येथील भगवान बिरसा मुंडे यांच्या जयंतीनिमित्त बोलताना व्यक्त केले.


देशाचे महान क्रांतिकारक ,जनजातीय अस्मिता व संस्कृती रक्षणासाठी इंग्रजी राजवटी विरोधात बंड पुकारणारे भगवान बिरसा मुंडा यांची जयंती तेलंगवाडी ता.कंधार येथे गावक-यांच्या वतिने बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस श्री संजय वारकड तहसीलदार नांदेड,अक्षय सुक्रे गटविकास अधिकारी व माजी सरपंच श्री सुरेश मामा बास्टे तेलंगवाडी यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जल,जंगल ,जमिन यासाठी गुल गुनाल बिरसा मुंडा यांनी आंदोलन छेडले , . त्याच बरोबर ब्रिटीश आणि त्यांच्या धर्मातील कारवाई विरूद्ध आदिवासी समाजाच्या हक्कासाठी त्यांनी लढा दिला.भगवान बिरसा मुंडा यांनी समाजाला एकत्रीत केले आणि त्यांना स्वाभिमानाची शिकवण दिली असे मत तहसीलदार संजय वारकड यांनी व्यक्त केले .


यावेळी गोविंदराव बास्टे,राजू वारकड स्था.अभि सहाय्यक पं.स.नांदेड, शिवाजीराव आडबे ,माधवराव आडबे ,दिलीपराव दासरे ,नवनाथ सुक्रे, आनंदराव आडबे ,आनंदराव माचेवाड, अरविंद दासरे ,अनिल दासरे , शिवहार पा.वारकड ,विलास वारकड , सुनिल वारकड, सुरज.पा.वारकड, ओम पा.वारकड, विजय दासरे , सुनिल दासरे,गणेश पोकले ,शंकर दासरे,हानमंत पोकले ,दिगंबर आडबे ,शिवाजी वारकड, भगवानराव आडबे ,श्रीनिवास सुक्रे, गंगाधर सुक्रे, मारोती मुपडे, बळीराम सुक्रे, राम भाऊ व गावातील नागरिक उपस्थित होते .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.




