Young man seriously injured in bear attack | मोहपुर शेत शिवारात अस्वलाच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी – NNL

किनवट,परमेश्वर पेशवे| 25 वर्षीय तरुणावर हिंसक वन्य प्राणी अस्वलाने हल्ला केल्याने या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मोहपूर शिंदगी शिवारात ही घटना आज सकाळी घडली.अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर झालेल्या तरुणाचे नाव शंकर मधुकर आमले असल्याचे समजते.


हा तरुण सकाळी जनावरे चारण्यासाठी सिंदगी मोहपूर शेतशिवारात गेला होता तेवढ्यातच अचानक अस्वलाने शंकर मधुकर आमले यांच्यावर हल्ला केल्याने या हल्ल्यात शंकर मधुकर आमले हा गंभीर जखमी झाला.

शंकर मधुकर आमले याच्यावर अस्वलाने हल्ला करून डोक्याला व डोळ्याच्या दोन्ही बाजूने जोराचा चावा घेतल्याने शंकर मधुकर आमले याच्या दोन्ही डोळ्याला मोठी दुखापत झाली. अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला शेजारील शेतकऱ्यांनी प्रथम ईलाजासाठी दवाखान्यात आणले असुन, या घटनेची माहिती किनवट येथील वनविभागाच्या वन अधिकाऱ्यांना मिळताच वन अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती वरिष्ठाला कळवून वन अधिकारी घटनास्थळी पोहोचले.


अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शंकर मधुकर आमले याला प्रथम ईलाजासाठी 25 हजाराची आर्थसाह्य मदत म्हणून वन विभागातर्फे करण्यात आली आहे. आणि पुढील उपचारासाठी त्यांना पाठवले आहे अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद राठोड यांनी ही माहिती दिली.




