नवीन नांदेड। ” योग “हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे . योगामुळे अनेक व्याधीवर उपाय म्हणुन पाहिले जाते . परंतु योगामुळे माणसिक स्थिरता माणसाला मिळते . रोज आपण योगामुळे श्वासावर नियंञन मिळते . शरीराचे – मनाचं कनेक्शन एक करते . त्यामुळे एकाग्रता वाढते . यामुळे प्रत्येकांनी योगा रोज करत आपल्यात एकाग्रता वाढवावी . त्यामुळे आपल्यात आभ्यासाची गोडी निर्माण होईल . आणि आपण आपल्या आई – वडीलाची इच्छा पुर्ण करुन यशाच्या शिखरा पर्यत पोहचु . यासाठी योगा हेच एक माध्यम असल्याचे मत सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव डाँ संतुकराव हंबर्डे यांनी योगा शिबिरात मार्गदर्शन करताना व्यक्त केले .
सहयोग सेवाभावी संस्थेच्यावतीने जागतिक योगादिना निमित्याने संस्थेच्या प्रागंणात दि २१ रोजी योग शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उदघाटन संस्थेचे सचिव डाँ संतुकराव हंबर्डे यांच्या हस्ते करण्यात आले . या योगा शिबिरास योग शिक्षक राम शिवपनोर , सुरेश लंगडापुरे याच्यासह इंदिरा काँलेज फिजोथेरीपी महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी शिबिरात प्रात्यशिक करुन दाखवले .
यावेळी संस्थेच्या विविध संकुलाचे विद्यार्थांनी सहभाग घेतला होता . या शिबिराला मार्गदर्शन करताना डाँ संतुकराव हंबर्डे यांनी विद्यार्थांना योगाचे महत्व विषद करताना योगा हा योगासन , प्राणायाम, ध्यान यासाठी मर्यातोत न रहाता त्याचा उपयोग शरीरातील व्याथीसाठी उपयुक्त ठरत आहे . योगाचे शारिरीक माणसिक फायदे लक्षात घेत जागतिक पातळीवर भारतीय संस्कृतीचा भाग असलेल्या योगाला संयुक्त राष्ट्राच्या महासभेत दि २१ जुन हा दिवस म्हणुन स्विकारले आहे असे ते म्हणाले .
यावेळी प्राचार्य डॉ बालाजी गिरगावकर, प्राचार्य शिवानंद बारसे, प्राचार्य डॉ ईशान अग्रवाल, प्राचार्य डॉ विजय नवघरे, प्राचार्य सुनील हंबर्डे, प्राचार्य विक्रम ढोणे,प्राचार्य सुनील पांचाळ प्रा डॉ प्रवीण मुळी प्रा डॉ जाधव, प्राचार्य हरी किशोर बाबू, प्रा भार्गवी मॅडम,राजेश केंद्रे यांच्यासह सहयोग संकुलातील विविध अभ्यासक्रमाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्याम हंबर्डे, नंदीराम जाधव, हरी पाटील, धारोजी हातागळे, राम लुटे,पांडुरंग आखरे, सुनील हीवंत , आकाश ही आदींनी परिश्रम घेतले.