मानसिक स्थिरतेसाठी ” योगा ” हे मुख्य साधन – डाँ संतुकराव हंबर्डे -NNL
नवीन नांदेड। " योग "हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे . योगामुळे अनेक व्याधीवर उपाय म्हणुन पाहिले जाते . परंतु योगामुळे माणसिक स्थिरता माणसाला मिळते . रोज आपण योगामुळे श्वासावर नियंञन मिळते . शरीराचे - मनाचं कनेक्शन एक करते . त्यामुळे एकाग्रता वाढते . यामुळे प्रत्येकांनी योगा रोज करत आपल्यात एकाग्रता वाढवावी . त्यामुळे आपल्यात आभ्यासाची गोडी निर्माण होईल . आणि आपण आपल्या आई - वडीलाची इच्छा पुर्ण करुन यशाच्या शिखरा पर्यत पोहचु . यासाठी योगा हेच एक माध्यम असल्याचे मत सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव डाँ संतुकराव हंबर्डे यांनी योगा शिबिरात मार्गदर्शन करताना व्यक्त केले .
सहयोग सेवाभावी संस्थेच्यावतीने जागतिक योगादिना निमित्याने संस्थेच्या प्रागंणात दि २१ रोजी योग शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उदघाटन संस्थेचे सचिव डाँ संतुकराव हंबर्डे यांच्या हस्ते करण्यात आले . या योगा शिबिरास योग शिक्षक र...
