नवीन नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक अनुषंगाने पालीका प्रशासनाने प्रारुप यादा प्रसिद्ध केल्या असून सर्वात मोठा प्रभाग क्रमांक 20 असुन या मधुन पाच नगरसेवक निवडून दयावचे असुन एकुण 20 प्रभागातुन 81 नगरसेवक निवडून येणार आहेत, प्रभाग निहाय प्रारुप यादी प्रशासनाने प्रसिद्धी केली आहे, पुर्वी प्रमाणेच सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत दोन प्रभागातील नगरसेवक संख्या नऊ राहणार आहे.


सार्वत्रिक निवडणूक अनुषंगाने मनपा प्रशासनाने 20 प्रभाग जाहीर केले असून यात एक प्रभाग चार तर शेवटच्या विस प्रभाग मध्ये पाच असे 81 नगरसेवक निवडून येणार असून केली असून सन 2017 चा निवडणूकीचा धर्तीवर ही सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.


प्रभाग क्रमांक 19 मध्ये 29 हजार 587 लोकसंख्या असुन वसरणी कौठा सह सिडको परिसराचा काही भाग तर 20 मध्ये 39 हजार 146 लोकसंख्या आहे ,दोन्ही प्रभागातील नगरसेवक संख्या नऊ असण्याची शक्यता असुन तर सर्वात मोठा प्रभाग क्रमांक 20 हा राहणार असुन या प्रभागात पाच लोकप्रतिनिधी असणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.


प्रभाग क्रमांक 19 मध्ये व्याप्ती मौ. फत्तेजंगपुर, असर्जन, कौठा, वसरणी, रहीमपुर व सिडकोचा भाग
दक्षिण मनपा हद्द ते पश्चिमेकडे परमंदिरसिंघ टमाना यांचे घर (यांच्या घरासमोर ओपन प्लॉट आहे) ते उत्तरेकडे जबादवार यांचे घराच्या उत्तरेकडील रिकामा प्लाॅटचा उत्तरपुर्व कोपरा ते पुर्वे कडे सेवा मेडिकल ते उत्तरेकडे गजभारे यांचे घर ते सिडको मुख्य रस्त्याने पश्चिमेंकडे रमाबाई संखाराम पंडीत यांचे घर (रमाबाई यांचे घरासमोर मेन रोडवर येवले यांचे घर आहे) ते पश्चिमेकडे धुत यांचे घरासमोरील रस्त्याने दक्षिणेकडे सिडको मुख्य रस्ता ते सनराईज इग्लीश स्कुलचा दक्षिण पश्चिम कोपरा ते १८ मी. डि.पी. रोड वरुन भगवान बाबा चौक ते लातुर रोड ते मनपा हद्द तर 20 प्रभाग व्याप्ती मौ.असदवन, वाघाळा, सिडकोचा भाग, हुडकोउत्तर मनपा हदद ते नांदेड लातूर रस्त्याने उत्तरेकडे मौ. फत्तेजंगपुर च्या पूर्व शिव हद्दीने दक्षिणेकडे मौ. असदवनच्या उत्तर शिव हद्दीने पूर्वेकडे मौ. वाघाळाच्या उत्तर शिव हद्दीने पूर्वेकडे सिडको मुख्य रस्ता ते पूर्वेकडे सिडको रस्त्यालगत सौ. रुपा गंदेवार यांचे घर ते उत्तरेकडे धुत यांचे घर ते पूर्वेकडे सिडको मुख्य रस्त्याने मिरकुटे यांचे घर ते दक्षिणेकडे कंठाळे यांचे घर ते पश्चिमेकडे मुळे यांचे घर ते दक्षिणेकडे कानडखेडकर यांचे घर ते दक्षिणेकडे शिव मंदिर ते पूर्वेकडे मनपा हद पर्यंत आहे.

मतदार संख्या ही वाढली असले तरीही नगरसेवक संख्या 81 असणार आहे, गणेशोत्सव दरम्यान इच्छुक व भावी सह विघमान नगरसेवक पुनश्च सक्रिय झाल्याचे पहावयास मिळाले आहेत ,प्रभाग प्रारूप यादी नंतर मनपा निवडणूक लगबग सुरू झाली आहे.


