किनवट, परमेश्वर पेशवे l भगवान विश्वकर्मा पुजन दिन निमित्त विश्वकर्मा वंशीय समाजाने वेरूळ येथे येऊन आपल्या समाजाची ताकद जगाला दाखवून द्यावी असे प्रतिपादन सत्यनारायण पांचाळ धर्माबादकर यांनी केले आहे.


विश्वकर्मा वंशीय समाज संघटना नांदेड जिल्हा आयोजित भव्य प्रचार व प्रसार दिंडी यात्रा धर्माबाद ते वेरूळ च्या दरम्यान किनवट येथे भेट दिली असता सत्यनारायण पांचाळ हे समाजाला मार्गदर्शन करताना बोलत होते. सोबतच मोहन पांचाळ यांनी देखील आपल्या समाजाला मोलाचा मंत्र दिला व मार्गदर्शन केले .


पुढे बोलताना ते म्हणाले की, सोनार,सुतार, लोहार, तांबट, शिल्पकार, जांगीड, पांचाळ आशा या जातीत विखुरलेला विश्वकर्मा समाज असून सृष्टी निर्मिती प्रभू विश्वकर्मा भगवान यांचे पुत्र म्हणून आपली ओळख असताना आपण एकत्रित येण्याची गरज आपल्याला आहे. शिक्षण, चिंतन ,प्रबोधन आणि संघटना यातून समाजहितासाठी संवर्धन करणे, एकत्रीकरण करणे विश्वकर्मीय बांधवांचे न्याय, हक्क प्रस्थापित करणे व राजकीय सामाजिक ताकद निर्माण करण्यासाठी येत्या १७ सप्टेंबर २०२४ रोजी भगवान विश्वकर्मा पूजन दिवशी वेरूळ येथील महासंमेलनाला सर्वांनी सहकुटुंब उपस्थित राहुल हे महासंमेलन असे आवाहन त्यांनी केले.


दरम्यान किनवट शहरात प्रभू विश्वकर्मा प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली व त्यानंतर कार्यक्रमाचे सांगता झाली. या कार्यक्रमास किनवट शहरातील विश्वकर्मावंशी सर्व समाज बांधव व प्रतिष्ठितांची उपस्थिती होती



