उस्माननगर,माणिक भिसे। लोहा कंधार मतदार संघातील तळागाळातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांचे मनापासून सेवा केल्यास पुण्य मिळते असे प्रतिपादन कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या सौभाग्यवती तथा शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्त्या सौ .आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी केले.
उस्माननगर तालुका कंधार येथे दिनांक 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष बालाजी ईसादकर , राहुल सोनसळे कैलास नाईकवाडे , शिवप्रसाद इसातकर प्रशांत डांगे लक्ष्मण गोरे संगम पोटजळे माधव नाईकवाडे संतोष डांगे यांच्यासह शेकापाच्या कार्यकर्त्यांनी नोंदणीकृत महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगारांना भांड्यांच्या किटचे वाटप सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून याप्रसंगी बालाजी ईसादकर ( शेकापा जिल्हा अध्यक्ष ) , सिद्धू पाटील वडजे , बालाजी हिलाल , महादेव पाटील घोरबांड कलंबर , सुधाकर सातपुते , फैयाज शेख , एजाज भोसीकर , विशाल कौशल्य , आधी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा यथोचित उस्माननगर च्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी शासनाच्या विविध योजना या गोरगरिबांच्या कल्याणासाठी बनवले आहेत. त्यांचा सर्व स्तरातील जनतेने लाभ घ्यावा. बांधकाम कामगारांना कीडचे वाटप करून चांगला उपक्रम राबविल्याबद्दल संयोजकाचे अभिनंदन यावेळी करण्यात आले.
त्यानंतर उपस्थित निराधार , श्रावणबाळ , विधवा , वयोवृध्द महिला मंडळाची आडी अडचणीच्या शंका दूर करून समाधानकारक प्रश्नाचे उत्तरे देऊन त्यांनी कोणाच्याही मागे न लागता मला कामे सांगा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. गोरगरिबाच्या लोकांची सेवा करण्यातच पुण्य मिळते असे भावनिक उदगार काढले. यावेळी महाराष्ट्र इमारत बांधकाम नोंदणीकृत बांधकामगारांना भांड्याच्या किटचे वाटप करण्यात आले यावेळी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.