श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या मौजे रुई येथील अल्पभूधारक शेतकरी बाळु तळनकर यांच्या शेतातील सोनेरी फुलांनी बहरत असलेले तुर पीक व हरबरा पिक वन्यप्राण्याने नष्ट केल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तूर,हरबरा पिकाची पाहणी करून आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी पिडीत शेतकरी बाळु तळनकर यांनी केली आहे.
सध्या रब्बी हंगामात शेतकर्यांनी शेतात तुर पिकासह हरभरा,गहू पिकांची पेरणी केलेली आहे.अशात वन्य प्राणी तुर पिकावर ताव मारुण हरभरा, गहू पिक वाढण्यापूर्वीच नष्ट करीत आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या त्रासाला शेतकरी कंटाळले आहे.मागील आठवड्यात रुई येथील अल्पभुधारक बाळु तळनकर यांच्या शेतातील तुर व हरबरा पिकाचे रोही व रानडुक्कराने नुकसान केले असून हातातोंडासी आलेल्या तुर पीकांचे मोठे नूकसान केले.सदरील प्रकार पिडीत अल्पभूधारक शेतकरी बाळु तळनकर व त्यांच्या पत्नी सुरेखा तळनकर यांनी माहूर येथील वनविभाग कार्यालय गाठून वनक्षेञ अधिकारी रोहीत जाधव यांना सांगण्याचा प्रयत्न केला.
परंतु कार्यालयातील कर्मचार्यांनी जाधव साहेब नाहीत दोन दिवसाने या असा सल्ला देत त्या पिडीत शेतकरी कुटूंबांची बोळवण केली.कार्यालयात भेट होत नसल्याने पिडीत शेतकर्यांनी रोहित जाधव यांना भ्रमणध्वनी वरुण झालेल्या प्रकाराची माहिती देण्याचा प्रयत्न केला असता, जाधव यांनी त्यांचा फोन स्वीकारला नसल्याने शेवटी हवालदिल झालेल्या शेतकर्याच्या पदरी निराशाच पडल्याची माहिती असून नूकसानग्रस्त शेतकर्यांने कुणाकडे तक्रार करावी ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
वन्य प्राणी शेतात धुमाकूळ घालीत आहे.शेतकऱ्यांनी आपल्या शेतात गहू, हरभरा पिकाची लागवड केली आहे. या भागातील वन्य प्राणी हरभरा पिकांची उगवण होण्याआधीच नाश करीत आहेत, त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.शेतकऱ्यांनी महागडे बियाणे आणून शेतात हरभरा पिकाची लागवड केली आहे, मात्र वन्य प्राण्यांनी शेतातील गहू,हरभरा पिक उगवण्यापूर्वीच नष्ट करीत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.वनविभागाचे अधिकारी लक्ष देत नाही.आम्ही कुणाकडे जावे. अशी प्रतिक्रिया बाळु मनोहर तळनकर पिडीत अल्पभूधारक शेतकरी यांनी दिली.
शेतकऱ्यांची आर्थिक नुकसानीची मागणी
वनविभागाने वन्य प्राण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी तालुक्यातील त्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे. जी जनावरे शेतातील गहू हरभरा पिकाचे नुकसान करतात त्या वन्य प्राण्यांचा वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. वन्यप्राण्याकडून शेतातील पिकाचे होत असलेले नुकसान त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान वनविभाग भरून देणार का? असा प्रश्न शेतकऱ्याकडून वनविभागाला विचारल्या जात आहे.