Forest Department Kumbhakarni in sleep : तूर,हरबरा पिकात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ ; वनविभाग कुंभकर्णी झोपेत -NNL
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या मौजे रुई येथील अल्पभूधारक शेतकरी बाळु तळनकर यांच्या शेतातील सोनेरी फुलांनी बहरत असलेले तुर पीक व हरबरा पिक वन्यप्राण्याने नष्ट केल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तूर,हरबरा पिकाची पाहणी करून आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी पिडीत शेतकरी बाळु तळनकर यांनी केली आहे.
सध्या रब्बी हंगामात शेतकर्यांनी शेतात तुर पिकासह हरभरा,गहू पिकांची पेरणी केलेली आहे.अशात वन्य प्राणी तुर पिकावर ताव मारुण हरभरा, गहू पिक वाढण्यापूर्वीच नष्ट करीत आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या त्रासाला शेतकरी कंटाळले आहे.मागील आठवड्यात रुई येथील अल्पभुधारक बाळु तळनकर यांच्या शेतातील तुर व हरबरा पिकाचे रोही व रानडुक्कराने नुकसान केले असून हातातोंडासी आलेल्या तुर पीकांचे मोठे नूकसान केले.सदरील प्रकार पिडीत अल्पभूधारक शेतकरी बाळु तळनकर व त्या...
