हिमायतनगर| “हर घर तिरंगा” उपक्रमाच्या उत्साहपूर्ण वातावरणात हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्याने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात मोठ्या प्रमाणात शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी “वंदे मातरम”, “भारत माता की जय” अश्या घोषणा देत सहभागी झाले होते.



दिनांक 14 ऑगस्ट (गुरुवार) रोजी श्री परमेश्वर मंगल कार्यालय मैदानातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. यां तिरंगा रैलीत शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी ” सहभागी होऊन भारत माता की जय”, “वंदे मातरम” अशा घोषणां दिल्या. आजच्या तिरंगा रैलीने वातावरण देशभक्तीमय झाले होते.


या रैलीत शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसेच शहरातील विद्यार्थी, सामाजिक संस्था, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हातात तिरंगा घेऊन देशभक्तीचे घोषवाक्ये देत रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रॅलीदरम्यान “वंदे मातरम”, “भारत माता की जय” या घोषणा दुमदुमल्या आणि परिसर देशभक्तीच्या रंगात रंगून गेला.




