नांदेड| बाबांच्या त्यागाला पर्याय नाही. “बाबा तुमच्यासाठी…!” ह्या नावीन्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत होत असलेल्या वृक्ष लागवडीसारख्या चांगल्या बाबींसाठी धर्माबाद पंचायत समिती प्रशासन अत्यंत सकारात्मक आहे असे प्रतिपादन नवनियुक्त गटविकास अधिकारी तोटावाड यांनी केले.


ते सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक तथा जेष्ठ पत्रकार श्री गोविंद मुंडकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी राबविण्यात येणारा कृतज्ञता पित्याची, “बाबा तुमच्यासाठी…” हा उपक्रम यावर्षी चार जुलै 2024 रोजी सुरू करण्यात आला. बाबा तुमच्या साठी..! या उपक्रमा अंतर्गत दि. १० जुलै रोजी धर्माबाद तालूक्यातील महादेवाचे प्रसिद्ध असलेल्या मौजे संगम येथील संगमेश्वर मंदिरात, ग्राम पंचायत संगम यांच्या वतीने साहेबराव जाधव यांच्या पुढाकाराने आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.या कार्यक्रमाच्या प्रारंभी मनामनातील श्रावण बाळ जागृत करण्यासाठी संगम येथील तिन नद्यांच्या संगमावर असलेल्या शुंभू महादेवाची पूजा आणि शंखनाद करण्यात आला. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते मंदीर परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. त्या झाडांना लागलीच संरक्षण मिळावे यासाठी जाळी उभारण्यात आली.



यावेळी प्रामुख्याने धर्माबाद पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रफुल्ल तोटावाड, सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर, संगमचे सरपंच विठ्ठल पाटील आष्टे,अभियंता साहेबराव जाधव, ग्रामसेवक डि. एम गमे, ग्रामसेवक शेख खय्युम,तंटामुक्ती अध्यक्ष शेख जमीर, चेअरमन संगमनाथ रोन्टेवाड, उपसरपंच प्रदिप भद्रे, सदस्य व्यंकट चौरेवार, मारोती सावडकर,दत्ता डुबुकवाड, साईनाथ रोन्टेवाड, गंगाधर रोन्टेवाड, महादेव मंदीराचे पूजारी पुंडलिक करे, जमनाजी रोन्टेवाड, अनिल संगमकर, सदानंद भद्रे, लक्ष्मण भद्रे यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरीक उपस्थित होते. धर्माबाद तालुक्यातील संगम येथे सुरू झालेला वृक्ष लागवड अभियान देगलूर तालुक्यातील होट्टल येथे समाप्त करणार असल्याचे संयोजक यांनी कळविले आहे.




