Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक
  • गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Guardian Minister Atul Save : तंत्रज्ञानाच्या मदतीने जिल्हा परिषदेच्या पारदर्शक सेवा : पालकमंत्री अतुल सावे
नांदेड राजकीय August 15, 2025

Guardian Minister Atul Save : तंत्रज्ञानाच्या मदतीने जिल्हा परिषदेच्या पारदर्शक सेवा : पालकमंत्री अतुल सावे

* जिल्हा परिषद नांदेड डिजिटल मित्र पोर्टलचा शुभारंभ * पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना जलद सेवा * संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्काराचे वितरण
NNL TeamBy NNL TeamAugust 15, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि जलद सेवा प्राधान्याने देण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदने “जिल्हा परिषद नांदेड डिजिटल मित्र पोर्टल” सेवा विकसित केली आहे. याचा मला मनस्वी आनंद होत आहे. नांदेड जिल्हा परिषदेने या व्हाट्सअॅप तंत्रज्ञानाच्या मदतीने नागरिकांना पारदर्शक सेवा उपलब्ध करुन दिल्या असल्याचे मत राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले.

“जिल्हा परिषद नांदेड डिजिटल मित्र पोर्टल” या एकात्मिक माहिती पोर्टलचा शुभारंभ पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे यांच्यासह पदाधिकारी, नागरिक, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाचा कणा असून यापूर्वी नागरिकांसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. या माध्यमातून संपूर्ण राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकारी-कर्मचारी प्रयत्नशील आहेत. ही सुविधा केवळ माहितीपुरती मर्यादीत नाही तर पारदर्शकता, वेळेची बचत आणि नागरिकांचा शासनावरील विश्वास वाढवणारी आहे. ग्रामीण भागातील लोकांना आता जिल्हा परिषद कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागणार नाहीत. नागरिकांना अधिक वेगवान व पारदर्शक सेवा मिळण्यासाठी या पोर्टलवरील ऑनलाईन सेवा नियमित अद्यावत ठेवण्याची सूचना पालकमंत्री अतुल सावे यांनी केली.

पोर्टलवरील सुविधा
डिजिटल युगात योजना आणि सुविधा थेट नागरिकांच्या मोबाईलवर पोहोचवण्याची गरज होती. हाच विचार पुढे नेऊन जिल्हा परिषद नांदेड डिजिटल मित्र हे पोर्टल विकसित केले आहे. या माध्यमातून कृषी, पशुसंवर्धन, घरकुल, समाज कल्याण, आरोग्य आदी सर्व विभागातील योजनांची माहिती एका क्लिकवर मिळेल. लाभार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येतो. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या भेटीची वेळ पोर्टलवरून निश्चित करता येते. योजनांबाबत व्हिडिओ क्लिप सहज पाहता येतील. अर्जाची सद्यस्थिती 48 तासात ऑनलाईन तपासता येते.

डिजिटल मित्र पोर्टलमुळे नांदेड जिल्हा ग्रामीण विकासाच्या डिजिटल क्रांतीत अग्रणी राहील आणि हे पोर्टल इतर जिल्ह्यांसाठी देखील एक आदर्श ठरेल. या उपक्रमाच्या यशासाठी जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पालकमंत्री अतुल सावे यांनी अभिनंदन केले. दुर्गम भागासह जिल्ह्यातील नागरिकांना सुलभ व जलद सेवा उपलब्ध करुन देण्याचा नांदेड जिल्हा परिषदेचा हा स्तुत्य उपक्रम आहे. या व्हाट्सअॅप सेवेद्वारे आपण शासकीय योजना, अर्जांची स्थिती आणि आवश्यक माहिती सहजपणे मिळवू शकता. घरी बसून एका क्लिकवर सेवा देण्याचा हा नांदेड जिल्हा परिषदेचा प्रयत्न असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कालवी यांनी प्रास्ताविकात सांगितले. या सेवेचा गैरवापर झाल्यास, पूर्वसूचना न देता क्रमांक सेवा यादीतून वगळला जातो, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्काराचे वितरण
आज या सोहळ्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत सन 2023-24 मधील जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरणही झाले. पुरस्कार मिळालेल्या सर्व सरपंच व ग्रामपंचायतीचे पालकमंत्री अतुल सावे यांनी अभिनंदन केले. आपली गावे स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे हीच खरी संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रेरणा आहे. केंद्र आणि राज्य शासनाने राबविलेल्या हर घर तिरंगा-हर घर स्वच्छता उपक्रमात अनेक गावांनी उत्साहाने सहभाग घेतला आहे. यापुढेही आपली गावे स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2023-24 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामपंचायत जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. सन 2023-24 या वर्षासाठी घोषित झालेल्या पुरस्कारांत प्रथम क्रमांक भोकर तालुक्यातील नागापूर ग्रामपंचायतीने मिळवून 6 लाख रुपयांचा पुरस्कार पटकावला तर द्वितीय क्रमांक हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव ग्रामपंचायतीने मिळवून 4 लाख रुपयांचा पुरस्कार मिळवला. तृतीय क्रमांक कंधार तालुक्यातील चिंचोली प.क. ग्रामपंचायतीला मिळून 3 लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात आला.

याशिवाय विशेष पुरस्कारांतर्गत स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार (घनकचरा, सांडपाणी व मैलागाळ व्यवस्थापन) बिलोली तालुक्यातील पाचपिंपळी ग्रामपंचायतीला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन) भोकर तालुक्यातील खरबी ग्रामपंचायतीला तर स्वर्गीय आबासाहेब खेडकर पुरस्कार (शौचालय व्यवस्थापन) अर्धापूर तालुक्यातील शेलगाव बु. ग्रामपंचायतीला देण्यात आला. या विशेष पुरस्कारास प्रत्येकी 50 हजार रुपये रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात आले. शेवटी आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) राजकुमार मुक्कावार यांनी मानले.

Guardian Minister Atul Save Transparent services of Zilla Parishad with the help of technology
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleGuardian Minister Atul Save : गुणवत्तेसोबतच सुरक्षित शहर म्हणून नांदेडचा लौकिक – पालकमंत्री अतुल सावे
Next Article grand Dahi Handi : शिवसेनेच्यावतीने भव्य दहीहंडीचे आयोजन ; 55555 रूपयांचे आकर्षक बक्षीस
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Amarnath Yatra | अमरनाथ गुहेतून भाग- 4 / लेखक:- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

July 9, 2024

डॉ. बिपिन बाभळे यांनी स्वीकारला वैद्यकिय अधीक्षक पदाचा पदभार -NNL

July 5, 2024

Gram Panchayat ; ग्रामपंचायत स्तरावर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावीपणे अमलबजावणी

April 24, 2025

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग १५ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

July 17, 2025
Advertisement
टॉप बातम्या

meeting of BJP : भाजपाच्या महत्वाच्या बैठकिचे आयोजन माहूर च्या सर्व पद्दधिकारी यांनी उपस्थित राहावे – घोडेकर -NNL

blood donation and health camp : एसटी मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथे महारक्तदान व आरोग्य शिबीर संपन्न -NNL

Rahul Kardile ; महसूल दिनाचे नांदेड तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते मोठ्या उत्साहाने उद्घाटन

New blue tooth printer ; मनपा मालमत्ता कर पावती साठी आता नव्याने ब्लु टुथ प्रिंटर.. – NNL

Finally, with the written assurance given by the Nagar Panchayat : अखेर नगरपंचायतीने दिलेल्या लेखी आश्वासनाने फुले नगरवासियांचे उपोषण तिसऱ्या दिवशी मागे

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?