नांदेड l व्यापारी मित्र मंडळ नवा मोढा शिवजन्मोत्सव सोहळा यांच्या वतीने शिवजन्मोत्सव निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आ.आनंदराव बोढारकर यांनी रक्तदान शिबीराचे उद्घाटन केले.


यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,आ.प्रताप पाटील चिखलीकर, आ.बालाजीराव कल्याणकर, माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या सह मान्यवर पदाधिकारी यांनी उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या.
19फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय समोर नवा मोढा नांदेड येथे दरवर्षी प्रमाणे याही सातव्या वर्षी शिव जन्मोत्सव निमित्ताने याही वर्षी भव्य रक्तदान शिबीर व महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी चतुरमुखी विनायक संगित संच असेगाव येथील गायीका गोदावरी झळके,ऋतूजा सपकाळ ,भक्ती भारती व ढोलकी पटु मंगेश असेगावकर यांच्या संगित संच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी मध्यप्रदेश बिराहणपुर येथुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्यी दुचाकीवरून तैलचित्र घेऊन आलेल्या नितीन सिंग खालसा, आर्यन नाईक, नितीन सिंग चव्हाण यांच्या यावेळी व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या शिवजन्मोत्सव निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रम यशस्वीते साठी व्यापारी मित्र मंडळ नवा मोढा पदाधिकारी प्रल्हाद पाटील, बालाजी पाटील, संतोष मुळे, नागनाथ सुर्यवंशी, शिवाजी वासरीकर, विठ्ठल देशमुख,प्रविण कासलीवाल, बद्रीनारायण मंत्री, राम राजगोरे, संभाजी मुळे ,सचिन पाटील डाकोरे, सुनिल देशमुख,दिलीप दमकोडंवार, बालाजी येरावार,व मित्र मंडळ यांनी परिश्रम घेतले. रक्तदान शिबीरात अनेक रक्तदाते यांनी रक्तदान केले, यावेळी जिजाई रक्तपेढी यांनी रक्त संकलन केले.
