उस्माननगर| शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यांमध्ये दिवसेंदिवस दरी निर्माण होत असून प्रत्येक शिक्षकांनी आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्याधानाचे पवित्र कार्य पार पाडावे असे प्रतिपादन शिक्षक दिनानिमित्त मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांनी केले.
उस्माननगर ता. कंधार येथील सम्राट अशोक प्राथमिक शाळेत भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीदिनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्याच्या हस्ते डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक राहुल सोनसळे म्हणाले स्वातंत्र्य भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांनी शिक्षण विषयक केलेल्या सुधारणा आजही समाजाला प्रेरणादायी ठरत आहेत . डॉ. राधाकृष्णन हे शिक्षक राष्ट्रपती बरोबरच ते एक थोर विचारवंत देखील होते. त्यांनी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब करावा . डॉ. राधाकृष्णन यांच्या शिक्षण विषयक विचार प्रत्येकाने आचरणात आणणे ही काळाची गरज आहे असे आव्हान केले. तर देविदास डांगे यांनी गुरु व शिष्य यांचे नाते कसे असावे , यावर सविस्तर माहिती देऊन आजच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानी व डोळस असावे ,आई वडील व गुरु यांच्या बद्दल त्यांच्या मनात आदरभाव असावा असे प्रतिपादन केले.
डॉ. राधाकृष्णन यांच्या जयंती दिनानिमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून सम्राट अशोक प्राथमिक शाळेत स्वयंशासन दिन घेण्यात आला यावेळी मुख्याध्यापक म्हणून मुबशिरा निजामोद्दीन शेख , यांनी तर शिक्षक म्हणून राहत जाफर पिंजारी , मोहमदी निजाम शेख , बुशरा मुसा शेख , हुमेरा दस्तगीर शेख , निदा निजाम शेख , आर्शिया तांबोळी , मारिया सदफ सय्यद , रूबिना सय्यद , शिवचरणा वारकड , मणिष सोनसळे , इसाक शेख , रामचंद्र हराळे , अशिष कोलते , तर सेवक म्हणून शैलेष सोनसळे , संघर्ष कांबळे यांच्या सह अनेक विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनीने शाळेचे कामकाज पाहिले . दिवसभर शाळेमध्ये स्वयंशासन दिन साजरा करताना विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे , मन्मथ केसे , देविदास डांगे, भगवान राक्षसमारे, देविदास डांगे ,नितिन सिध्दोधन लाटकर, शेख शकील , समता जोंधळे , सौ. रोहीणी सोनकांबळे , मणिषा भालेराव यांच्या सह अनेकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले