Principal Rahul Sonsale ; आजच्या शिक्षकांनी डॉ. राधाकृष्णन यांचे विचार आचरणात घ्यावे – मुख्याध्यापक राहुल सोनसळे – NNL
उस्माननगर| शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यांमध्ये दिवसेंदिवस दरी निर्माण होत असून प्रत्येक शिक्षकांनी आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्याधानाचे पवित्र कार्य पार पाडावे असे प्रतिपादन शिक्षक दिनानिमित्त मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांनी केले.
उस्माननगर ता. कंधार येथील सम्राट अशोक प्राथमिक शाळेत भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीदिनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्याच्या हस्ते डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक राहुल सोनसळे म्हणाले स्वातंत्र्य भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांनी शिक्षण विषयक केलेल्या सुधारणा आजही समाजाला प्रेरणादायी ठरत आहेत . डॉ. राधाकृष्णन हे ...
