उस्मान नगर (मोठी लाठी) ( ता. कंधार) l येथील जाज्वल तिर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणारे व नव्याने उभारण्यात आलेल्या श्री गुरु नागय्या स्वामी संजीवन समाधी मंदिर येथे आज रविवार दि.७ डिसेंबर २०२५रोजी श्री गुरू वेदांताचार्य, युवासंत १०८ दिगंबर शिवाचार्य स्वामीजी वसमतकर महाराज व श्री दत्त मंदिराचे श्री गुरू अवधूत बन महाराज यांच्या शुभहस्ते कलशारोहन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.त्यानंतर आशिर्वचन होणार आहे.


या संजीवन समाधीची ख्याती सर्वदूर असून शिराढोण येथील श्री भीमाशंकर महाराज कलंबर येथील अगडबुवा यांच्या समकालीन असलेल्या श्री गुरु नागया स्वामी महाराज यांच्या जागृत संजीवन समाधी स्थळी सुद्धा पूर्वी अग्निकुंड प्रवेश पालखी प्रवेश सोहळा होत असे. भक्तांच्या हाकेला धावणारे श्री गुरू नागय्यास्वामी अनेकांच्या श्रद्धास्थानी आहेत.


उस्मान नगर येथील जंगम समशानभूमीत असलेल्या या संजीवन समाधी जवळ श्री. वैजनाथ स्वामी महाराज यांच्या पुढाकारातून या परिसरात निवारा उभारुन अनेक वर्ष वीरशैव भजनी मंडळाची सेवा घडली. सुमारे 200 वर्षापूर्वीचे केवळ चुनखडीत असलेल्या निजाम कालीन मंदिर केवळ एका पायावर उभे होते त्याचा जिर्णोद्धार श्री. वैजनाथ महाराजांच्या पुढाकारातून करण्यात आला. आज पुन्हा या संजीवन समाधी मंदिराची नव्याने उभारणी केली असून या अतिशय भक्ती भावाने कलशारोहण सोहळा दिमाखात साजरा होत आहे. आई वडील श्री वैजनाथ स्वामी व सौ. सुमनबाई यांच्या स्वप्नाची पूर्तता या निमित्ताने होत आहे.


गावातील या वैभवशाली तीर्थक्षेत्राच्या कलशारोहण सोहळा निमित्ताने सकाळी दहा पासून दिवसभर होणाऱ्या या भक्तिमय सोहळ्यातील विविध धार्मिक कार्यक्रमासह गुरुवर्यांचा आशिर्वचनाचा लाभ घ्यावा. व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .
तरी गावासह परिसरातील भाविकांनी कलशारोहण, गुरूवर्याचे आशिर्वचन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन मठपती परिवार यांच्याकडून करण्यात येत आहे.



