Usmannagar ; उस्माननगर येथील श्री गुरु नागय्या स्वामी संजीवन समाधी मंदिर येथे आज कलशारोहण सोहळाव गुरूवर्याचे प्रवचन
उस्मान नगर (मोठी लाठी) ( ता. कंधार) l येथील जाज्वल तिर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणारे व नव्याने उभारण्यात आलेल्या श्री गुरु नागय्या स्वामी संजीवन समाधी मंदिर येथे आज रविवार दि.७ डिसेंबर २०२५रोजी श्री गुरू वेदांताचार्य, युवासंत १०८ दिगंबर शिवाचार्य स्वामीजी वसमतकर महाराज व श्री दत्त मंदिराचे श्री गुरू अवधूत बन महाराज यांच्या शुभहस्ते कलशारोहन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.त्यानंतर आशिर्वचन होणार आहे.
या संजीवन समाधीची ख्याती सर्वदूर असून शिराढोण येथील श्री भीमाशंकर महाराज कलंबर येथील अगडबुवा यांच्या समकालीन असलेल्या श्री गुरु नागया स्वामी महाराज यांच्या जागृत संजीवन समाधी स्थळी सुद्धा पूर्वी अग्निकुंड प्रवेश पालखी प्रवेश सोहळा होत असे. भक्तांच्या हाकेला धावणारे श्री गुरू नागय्यास्वामी अनेकांच्या श्रद्धास्थानी आहेत.
उस्मान नगर येथील जंगम समशानभूमीत असलेल्या या संजीवन समाधी जवळ श्री. वैजना...
