HomeनांदेडTipper caught transporting sand illegally : अवैध रित्या रेती वाहतूक करणाऱ्या टिपर...

Tipper caught transporting sand illegally : अवैध रित्या रेती वाहतूक करणाऱ्या टिपर पकडले; महसूल विभागाची कारवाई

उस्माननगर| सायाळ ते मरळक रस्त्यावर अवैध रित्या रेतीने भरून वाहतुक करणाऱ्या टिपर पकडून कारवाई करण्यात आली आहे.

सविस्तर महीती अशी की, नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कर्डिले व तहसीलदार संजय वारकड यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध वाळु माफिया कडून अवैध मार्गाने वाहतूक संदर्भाने कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्यानिमित्ताने महसूल प्रशासन जोमाने कामाला लागले आहे , वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच सायाळ ते मरळक रस्त्यावर MH 20 , AT 9844 क्रमांकाचा टिपर सायाळ ते मरळक रस्त्यावर रेती अवैध वाहतूक करताना आढळून आला.

त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.यावैळी अवैध गौण खनिज पथक प्रमुख शिवानंद स्वामी ( मंडळधिकारी ) , तरोडा तलाठी माधव एकनाथ शिगळे, शाखा मरळक यांनी पकडून तहसील कार्यालय नांदेड येथील प्रांगणात लावले असून सदर कारवाईत तलाठी कल्यणकर, पाटील, करंदीकर, पो.पा. स्वामी, पो.पा.कदम यांनी सहकार्य केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments