श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहुर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील लिबायत फाटा येथील अपघात प्रवण क्षेत्र असलेल्या वळणावर दोन दुचाकीच्या विचित्र अपघात तिघे जन गंभिर जखमी झाले. असंल्याची घटना दि ४ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली असून जखमीना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले.
राष्ट्रीय महामार्गावरील लिबायत फाटा वळणावर अपघाताची मालीका सुरूच असून अपघातात अनेक जनांना जिव गमावला आहे तर दि ४ डिसे रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास दोन दुचाकी क्र, एम एच २९ सि जी ७१९१ हि रस्त्याच्या काठेच्या खोल दरीत कोसळली अशा विचित्र अपघात बळीराम दत्तात्रेय जगताप वय ४५, प्रतिक शामराव लोखंडे ३० दोघे ही रा, लिबायत तर अशोक भगवान तांबे वय २० रा.भंडारी ता आर्णी हे गंभीर जखमी झाले.
त्यानां माहुर येथिल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे वैद्यकीय अधिक्षक किरण कुमार वाघमारे. डॉ विपिन बाभळे. व त्यांच्या टिम ने प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी तिघाना ही शासकीय रुग्णवाहिकेतून यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे