नांदेड| जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना असलेल्या अधिकारान्वये सन 2025 मधील तीन स्थानिक सुट्ट्या आज जिल्हा प्रशासनाने जाहीर केल्या आहे.


जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये १७ जानेवारी, १ सप्टेंबर, १८ डिसेंबर या तीन तारखांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये १७ जानेवारीला हसरत हाजी सैयाह सखरे मगदूम बडी दर्गाह कंधार ऊर्स, एक सप्टेंबरला ज्येष्ठा गौरी पूजन तर 18 डिसेंबरला श्रीक्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रा निमित्त सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहे.

केंद्र शासनाची कार्यालय, न्यायालय व बँक वगळता राज्य शासनाच्या सर्व कार्यालयाला, स्थानिक स्वराज्य संस्थांना, शाळा महाविद्यालयांना, या तीन सुट्ट्या लागू असतील,असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
