आरोग्यनांदेड

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अतिगंभीर रुग्णांवर केले यशस्वी उपचार – NNL

नांदेड| डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात निकीता रविंद्र अवतारे, वय 35 वर्ष रा. गाडीपुरा नांदेड यांना 3 ऑगस्ट 2024 रोजी पोटामध्ये दुखत असल्यामुळे दाखल दाखल केले होते.

या रुग्णाच्या विविध चाचण्या व तपासण्या करुन रुग्णास चीरा हर्निया असल्याचे निदान करण्यात झाले. या रुग्णावर अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली शल्यचिकित्सक शास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर विद्याधर केळकर यांनी व त्यांचे चमुने अति गुंतागुतीची शस्त्रक्रीया करुन रुग्णाचा आजार पूर्णपणे बरा होईल या दृष्टीने उपचार केले.

तसेच दुसरा रुग्ण श्रीमती अजमा बेगम लईस खान वय 26 वर्षे रा. अर्धापूर यांना 26 जुलै रोजी पोट फुगल्याने रुगणालयात दाखल केले होते. त्या अत्यवस्थ व अतिगंभीर स्थितीत रुग्णालयास तपासणी व उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. आतड्यांसंबंधी छिद्र (Intestinal perforation) निदान झाले. या रुग्णावर शल्यचिकित्याशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर सुनिल बोंबले यांनी त्यांच्या टिमने अति गुंतागुतीची शस्त्रक्रीया करुन रुग्णाचा आजार पूर्णपणे बरा होईल यादृष्टीने पुढील योग्य ते उपचार केले. याबाबत दोन्ही रुग्णांनी शस्त्रक्रिया, उपचार, रुग्णसेवा, कक्षातील स्वच्छता, रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी रुग्णासोबतची वर्तवणूक याबाबत रुग्णाने खूपच समाधान व कृतज्ञता व्यक्त केली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button