नवीन नांदेड l नांदेड शहरापासून जवळच असलेल्या लाखो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात श्रावण मास पहिला सोमवार निमित्त दी 28 जुले पहिल्या सोमवार निमित्ताने पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतले, यावेळी महादेवाचा गजर करत दर्शन रांगेत जय , जय काळेश्वर भगवान कि जय घोषणा देण्यात आल्या.


रात्री १ ते ५ महा अभिषेक ,संध्याकाळी गोदावरी माता व काळेश्वर आरती आयोजित केली होती यानंतर सकाळपासून मोठ्या प्रमाणात हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतले..
काळेश्वर मंदिर विश्वस्त समिती यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रावण मास निमित्ताने सुरूवात पहिला सोमवार 28 जुले रोजी भाविक भक्तांची दर्शन साठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहता दर्शन साठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती तर ग्रामीण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी मोठ्या प्रमाणात अधिकारी, पोलीस अमलंदार,महिला पोलीस, होमगार्ड यांच्या कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


श्रावण महिन्यात पहिल्या सोमवारी 28 जुलै रोजी सकाळी विश्वस्त समिती अध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या हस्ते व पुजारी रामेश्वर लिंगप्पा धणमणे स्वामी, सतिश धनमणे स्वामी,राम धनमणे,यांच्या विधीवत व मंत्रोच्चाराने महाअभिषेक,महा पुजा, महाआरती तर सायंकाळी गोदावरी माता नदीच्या काठावर महाआरती व काळेश्वर मंदिरात संध्याकाळी आरती आयोजित करण्यात आली व श्रावणमास निमित्ताने दैनंदिन श्रावणमास मध्ये दुपारपासून भाविक भक्तांसाठी महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते,श्रावणमासा महिनाभर व पहिल्या सोमवार निमित्ताने होणारी भाविक भक्तांची गर्दी पाहता वाहनतळ यासह भाविक भक्तांसाठी पिण्याचे पाणी,दर्शन रांग यासह सुविधा उपलब्ध करून देण्यात आले होते.


तर ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीसनिरीक्षकओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गढवे, सपोनि 14 अधिकारी उपनिरीक्षक 61 पोलीस अंमलदार 26,महिला पोलीस कर्मचारी ,33 होमगार्ड व 16 महिला होमगार्ड यांच्यी नेमणूक करण्यात आली आहे तर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती.

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर,माजी आ.मोहनराव हंबर्डे,डॉ.संतुकराव हंबर्डे सरपंच संध्या विलास हंबर्डे, ऊपसरपंच अर्चना विश्वनाथ हंबर्डे सरपंच प्रतिनिधी राजु हंबर्डे व ऊपसरपंच विश्वनाथ हंबर्डे ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी यांनी दर्शन घेऊन विश्वस्त समितीला सहकार्य केले.
श्रावणमास निमित्ताने बेल पाने व फुले,यासह पुजेसाठी लागणारी दुकाने व खेळणी साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दुकाने लावण्यात आली होती,श्रावणात पंचक्रोशीतील नांदेड दक्षिण, उत्तर, यासह लोहा,कंधार, गंगाखेड, तालुक्यातील अनेक भाविक भक्त दर्शन साठी मोठया प्रमाणात आली होती ,श्रावण सोमवार निमित्ताने विश्वस्त समिती यांच्या मार्फत भाविक भक्तांसाठी विशेष सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विश्वस्त समितीचे अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर,कोषाध्यक्ष ऊतमराव हंबर्डे,सचिव शंकरराव हंबर्डे,धारोजीराव हंबर्डे,बालाजीराव हंबर्डे,विठ्ठलराव हंबर्डे,यांच्या सह पदाधिकारी पोलीस पाटील प्रविण हंबर्डे,सेवादार सतीश भेंडेकर गावातील युवक यांनी उपस्थित राहून दर्शन रांगा सह मंदिर परिसरात सहकार्य केले.श्रावणमास निमित्ताने पहिल्या दिवशी व पहिला श्रावण सोमवार निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी उपस्थित भाविक भक्तांनी मायओन मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित महाप्रसादाचा लाभ घेतला.


