क्राईमनांदेड

Mavas Dera killed her sister-in-law : हदगाव तालुक्यात मावस देराने केला वहिनीचा विळ्याने वार करुन खून -NNL

नांदेड/हदगाव| नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात येणाऱ्या मौजे कोळगाव येथे मावस देराने विळ्याने सपासप वार करून वहिनीचा निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. आरोपी शंकर बाबुराव जगताप वय ४० वर्ष रा. कोळगाव याला तामसा पोलिसांनी गुरुवारी अटक केली असून, मयत रेखा मारुती जाधव वय ३८ यांच्या पार्थिवावर शुक्रवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

मयत रेखा मारुती जाधव वय ३८ या गुरुवारी दुपारी शेतात झाडाखाली बसलेल्या असताना तिच्यासोबत आरोपी शंकर जगताप याने वाद घातला. वाद विकोपाला गेल्याने आरोपीने आपल्या हातातील विळ्याने सपासप वार केले. ओरडण्याचा आवाज आल्याने बाजुला असलेल्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या रेखा जाधव यांना नांदेड येथे उपचारासाठी हलिवले. यात विळ्याचा जबर हल्ल्यामुळे अति रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले.

शेती अन् आर्थिक देवाण घेवानीच्या रेखा जाधव यांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी शंकर जगताप व रेखा जाधव यांच्यात आर्थिक देवाण-घेवान होती. याच कारणावरुन शेतात दोघात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने आरोपी शंकर जगतापने रेखा यांच्यावर विळ्याने सपासप वार करुन गंभीर जखमी केले. यातच त्यांचा मृत्यू झाला असून, या प्रकरणी तामसा पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्यात असल्याची माहिती सपोनि कमल शिंदे यांनी माध्यमांना दिली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button