Friday, May 15

Tag: In Hadgaon taluka Mavas Dera killed her sister-in-law. by stabbing her with a sickle

Mavas Dera killed her sister-in-law : हदगाव तालुक्यात मावस देराने केला वहिनीचा विळ्याने वार करुन खून  -NNL

Mavas Dera killed her sister-in-law : हदगाव तालुक्यात मावस देराने केला वहिनीचा विळ्याने वार करुन खून -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड/हदगाव| नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात येणाऱ्या मौजे कोळगाव येथे मावस देराने विळ्याने सपासप वार करून वहिनीचा निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. आरोपी शंकर बाबुराव जगताप वय ४० वर्ष रा. कोळगाव याला तामसा पोलिसांनी गुरुवारी अटक केली असून, मयत रेखा मारुती जाधव वय ३८ यांच्या पार्थिवावर शुक्रवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मयत रेखा मारुती जाधव वय ३८ या गुरुवारी दुपारी शेतात झाडाखाली बसलेल्या असताना तिच्यासोबत आरोपी शंकर जगताप याने वाद घातला. वाद विकोपाला गेल्याने आरोपीने आपल्या हातातील विळ्याने सपासप वार केले. ओरडण्याचा आवाज आल्याने बाजुला असलेल्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या रेखा जाधव यांना नांदेड येथे उपचारासाठी हलिवले. यात विळ्याचा जबर हल्ल्यामुळे अति रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आर...
error: Content is protected !!