Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

February 4, 2026

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

February 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
  • Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन
  • PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन
  • Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न पेटला
  • Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस
  • Hadgaon Nagar Parishad : हदगाव नगर परिषदेची धक्कादायक आर्थिक स्थिती पाहून आ. कोहळीकरही ‘आवाक’
  • Mahavitaran : महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्या दिवशी अर्धनग्न आंदोलन सुरु
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Khambir leadership : राज्याचे ‘खंबीर नेतृत्व’, मराठवाड्याचा ‘आधारवड’ कोसळला!
नांदेड पुणे मुंबई लेख January 29, 2026

Khambir leadership : राज्याचे ‘खंबीर नेतृत्व’, मराठवाड्याचा ‘आधारवड’ कोसळला!

NNL TeamBy NNL TeamJanuary 29, 202631
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

प्रशासनावरील ज्यांची ‘वचक’, कामाचा ‘उरक’ पाहून अधिकारीही थक्क व्हायचे, असे संपूर्ण राज्याचे खंबीर नेतृत्व हरपले. अजित (दादा) पवार केवळ एका जिल्ह्याचे मर्यादित नेतृत्व नव्हते, तर ते राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजन मंत्री आणि अल्पसंख्याक विकास मंत्री म्हणून राज्याचा गाडा समर्थपणे हाकत. ते राज्याचे नेते होतेच, पण त्याही पलीकडे जाऊन मराठवाडा विभागावर त्यांचा विशेष लोभ होता. दादा मूळचे पश्चिम महाराष्ट्राचे, पण धाराशिव त्यांचे सासर. त्यामुळे मराठवाड्याचे ‘जावई’ म्हणून त्यांचा या भागावर जीव होताच, पण बीड जिल्ह्याचे ‘पालकमंत्री’ म्हणून त्यांनी जिल्ह्याला पितृवत प्रेम दिले.

तखत श्री हजूर अबचलनगर साहिब जी गुरुद्वारातील ती ‘अखेरची’ भेट
अवघ्या दोन दिवसांपूर्वी, २५ जानेवारीला दादा मराठवाडा विभागाच्या दौऱ्यावर, नांदेडच्या पवित्र भूमीत होते. नांदेड येथील ‘तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब’ गुरुद्वारात ते नतमस्तक झाले. सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पवित्र गुरुद्वारात अत्यंत भक्तीभावाने दर्शन घेतले. ‘कडा प्रसाद’ ग्रहण केला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते.

दर्शन झाल्यानंतर ते गुरुद्वारा परिसरात थांबले. ‘तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब’जीं चे दर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेऊन, बाहेर येईपर्यंत दादा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाट पाहत होते. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर सर्व मंत्री महोदय यांनी पवित्र गुरुद्वारातून एकत्रितपणे ऐतिहासिक ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शताब्दी समागम कार्यक्रमासाठी मोदी मैदानाकडे प्रस्थान केले. राज्याचे नेतृत्व म्हणून ज्येष्ठता आणि पदाचा मान राखण्याची त्यांची ही कृती सर्वांनाच भावली. गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ जी यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उपस्थित सर्व मान्यवरांचा यावेळी सन्मान केला.

पालकमंत्र्यांचा ‘धडाका’ आणि ‘विक्रमी नोंद ‘
बीडमध्ये त्यांनी विकासाचा विक्रम रचला होता. १ जानेवारी २०२६ ला वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी बीडमध्ये एकाच वेळी १३६३ विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करून प्रशासनालाही अवाक केले होते.

केवळ इमारती नाहीत, तर निसर्गाशी नाते जोडत त्यांच्याच उपस्थितीत बीडमध्ये एकाच दिवशी ३० लाखांहून अधिक वृक्ष लागवड करण्यात आली. याची नोंद ‘इंडिया रेकॉर्ड’ (India Book of Records) मध्ये झाली. तरुणांवर त्यांचे विशेष प्रेम होते, म्हणूनच खेळाडूंसाठी क्रीडा विभागाचा २५ कोटींचा निधी मंजूर करून त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘टर्फ ग्राउंड’ बीडकरांना दिले.

सहकार आणि अर्थाची जोड
प्रशासकीय शिस्तीचे भोक्ते असलेल्या दादांनी बीडमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या विभागाच्या भव्य ‘सहकार संकुला’चे भूमिपूजन केले. सर्व सहकारी कार्यालये एकाच छताखाली असावीत, हा त्यांचा आग्रह होता. राज्याचे वित्त व नियोजन मंत्री या नात्याने त्यांनी बीडच्या विकासाला कधीच निधी कमी पडू दिला नाही. १७ सप्टेंबर २०२५ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अहिल्यानगर-बीड’ रेल्वेचे उद्घाटन झाले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी २ हजार कोटींपेक्षा जास्त निधी आणि ऐनवेळी दिलेले १५० कोटी रुपये, ही अर्थमंत्री म्हणून दादांनीच मंजूर केले होते.

हृदयाची काळजी घेणारे ‘दादा’
बीड जिल्हा रुग्णालयात ‘कार्डियाक कॅथलॅब’ देऊन त्यांनी गोरगरिबांच्या हृदयाची सोय केली. दुर्दैवाने, बीडकरांच्या हृदयाची काळजी घेणाऱ्या पालकमंत्र्यांचे हृदय मात्र आज थांबले. एकीकडे राज्याच्या अर्थव्यवस्थेचे सुकाणू समर्थपणे सांभाळणारे ‘वित्त व नियोजन मंत्री’ आणि दुसरीकडे बीडच्या प्रत्येक प्रश्नावर बारकाईने लक्ष घालणारे ‘पालकमंत्री’… अशी दुहेरी भूमिका त्यांनी समर्थपणे पेलली. धाराशिवचे जावई आणि बीडचे पालक असलेल्या या विकासपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली!

लेखक – डॉ. श्याम टरके, सहायक संचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, लातूर.

collapsed! Marathwada's 'Aadharwad' The state's 'Khambir leadership'
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHimayatnagar railway station : हिमायतनगर रेल्वे स्थानकाचे रूपड बदललं… पण सुविधा विसरल्या? प्रवाशांच्या अडचणीत वाढ
Next Article Maharashtra’s Chitrarath : प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला देशात प्रथम क्रमांक
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न पेटला

Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Nanded ; नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील सरपंचांना निधी कमी पडू देणार नाही

February 28, 2025

आई – वडिलांच्या चरित्र वाचनातून विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणा घ्यावी – कुलगुरू डॉ. चासकर -NNL

June 19, 2024

Meeting Nagpur ; आंतरराज्य बॉर्डर किटकजन्य अधिकारी यांची नागपूर येथे बैठक संपन्न

May 30, 2025

Malegaon pilgrimage : यळकोट यळकोट जय मल्हार… देवस्वारी व खंडोबाच्या पालखी पूजनाने माळेगाव यात्रेस सुरुवात

December 18, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Dr. Babasaheb Ambedkar ; सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वही,पेन, मिठाई वाटप, पोलीस कर्मचारीसाठी अन्नदान

प्रलंबित वर्धा- यवतमाळ- नांदेड -रेल्वे प्रकल्प मार्गी लागेल का…! -NNL

Pratap patil chikhalikar : मा.खासदार तथा विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त विशेष कार्यवृतांन्त

Mahakali Yatra : कोतलवाडी (सरसम बु.) येथे श्री महाकाली यात्रा महोत्सव २०२६ ला भव्य शोभायात्रेने सुरुवात

Importance of voting ; मतदानासाठी विद्यार्थ्यांनी पालकांना घातले साकडे विद्यार्थ्यांनी पालकांना लिहिले मतदानाचे महत्त्व सांगणारे संकल्पपत्र – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

February 4, 2026

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

February 4, 2026

Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात

February 4, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?