नायगाव बा, सय्यद अजिम नरसीकर| नांदेड जिल्ह्यातील नायगाव बाजार येथील प्रसिद्ध दर्गाह हजरत सय्यद तवक्कलशाह वली (रहमतुल्ला अलैह) यांचा संदल उर्स मोठ्या उत्साहात, भक्तीभावाने व शांततेच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या उर्सनिमित्त संपूर्ण नायगाव बाजार परिसर भक्तीमय वातावरणाने भारावून गेला होता.


संदल उर्सच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीचे आयोजन मुतवली, शेख ईस्माईल रहेमानसाब मुल्ला, मुतवली शेख गन्नी अमीनसाब मुल्ला, मुतवली हाजी शेख युसुफ, मुतवली हाजी शेख लतीफसाब रहीमसाब मुल्ला (सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.


भव्य संदल मिरवणूक
दि. १२ जानेवारी २०२६ (२२ रज्जब) रोजी दुपारी ३.०० वाजता दर्गाह हजरत सय्यद तवक्कलशाह (रहमतुल्ला अलैह) येथून संदल मिरवणुकीस सुरुवात झाली. ही मिरवणूक जुना पोस्ट, भाजीपाला मार्केट, मार्केट कमिटी, पानसरे नगर, लहुजी साळवे नगर, आंबेडकर चौक, बस स्टँड, हेडगेवार चौक, शिवाजी चौक, जुना मोंढा आदी प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुन्हा दर्गाह परिसरात पोहोचली.



धार्मिक विधी
या वेळी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यांचे प्रतिनिधी सुधाकर बळवंतराव पाटील चव्हाण व धनंजय शंकरराव पाटील चव्हाण उपस्थित होते. बरेली येथील मुस्लिम धर्मगुरू मौलाना मुफ्ती मोहम्मद अफजलसाब तसेच जमा मस्जिदचे इमाम महबूब आलमसाब यांच्या हस्ते दर्गाहवर संदल चढविण्यात आला. त्यानंतर फातेखानी, सलाम व दुआ झाल्यानंतर संदल मिरवणुकीचे विधिवत विसर्जन करण्यात आले.

सामाजिक सलोखा व एकोप्याचे दर्शन
उर्स संदल निमित्त दर्गाह परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. या मिरवणुकीत मुस्लिम समाजातील प्रमुख कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकोप्याने सहभागी झाले होते. सर्व समाजातील नागरिकांनी दिलेल्या सहकार्यामुळे उर्स अत्यंत शांततेत व उत्साही वातावरणात पार पडला.
यावेळी मुतवली व समाजातील प्रमुख कार्यकर्ते शेख रफीक ईब्राहीमसाब मुल्ला, शेख अहमद मुल्ला, शेख गौस ईब्राहीमसाब मुल्ला, शेख बाबू जिलानीसाब मुल्ला, शेख दाऊद इब्राहीमसाब मुल्ला, शेख मैनोद्दीन महेबुबसाब मुल्ला, शेख समदानी मुल्ला, शेख सलीम मुल्ला, शेख मुबिन हाजी युसुफसाब मुल्ला, शेख बाबू बडे मिया मुल्ला, शेख कलीम मुल्ला, शेख अझहर मुल्ला, शेख गौस छोटे मिया मुल्ला, शेख महेबूब ईस्माईलसाब मुल्ला, शेख युनूस मुल्ला, शेख फयाज छोटे मिया मुल्ला, शेख अजीज मुल्ला, शेख जावेद मुल्ला, शेख इरफान मुल्ला तसेच सर्व मुल्ला बिरादरी व गावातील असंख्य समाजबांधव उपस्थित होते. या उर्सने नायगाव बाजारात धर्म, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला.

