नांदेड| सामान्य नागरिकांचे जीवन सुकर, सहज व प्रशासकीय स्तरावर अडथळा विरहित होण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागाने कंबर कसली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शंभर दिवसातील ७ सुत्री कार्यक्रमाची (7 Day Event) जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असून शेत शिवारातील रस्ते व त्या संदर्भातील अडचणीला या मोहिमेत सोडवण्याचे प्राधान्य देण्यात आले आहे.
सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे (ईज ऑफ लिव्हिंग) यासाठी १०० दिवसांचा ७ कलमी कृती कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Cm Devedra Fadanvis) यांनी जाहिर केला आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात कृती कार्यक्रमाच्यात अमंलबजावणीला सुरुवात करण्यात आली असून या कार्यक्रमांतर्गत सामान्य नागरिकांशी संबंधित असलेली कामे १०० दिवसांची विशेष मोहिम राबवून पुर्ण करण्या्त येणार आहेत.
आपल्या् गावातील गाडी रस्ते, पाणंद, शिवरस्तेे, शेतरस्ते, शिवार रस्ते, शेतावर जाण्याचे पायमार्ग हे अतिक्रमण किंवा इतर कारणामुळे बंद झालेले असल्यास या रस्त्यावरील अतिक्रमण,अडथळा दूर करण्या्साठी शेतकऱ्यांनी संबंधित तहसीलदाराकडे २५ जानेवारी, २०२५ पर्यंत रितसर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (collecter Abhijit Raut) यांनी केले आहे.
समृध्द व शाश्ववत शेती विकासासाठी शेती व्यनवस्थापन जलदगतीने होणे आवश्य्क आहे. अनेक ठिकाणी जून्या काळातील गाडी रस्ते / पाणंद/ शिवरस्तेथ/शेतरस्ते/शिवार रस्ते/शेतावर जाण्याचे पायमार्ग वहीवाटीचे अभावी अतिक्रमीत झालेले आहेत, अरुंद झालेले आहेत. त्यातमुळे शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करणे, देखरेख करणे याकामी अडचण निर्माण होत असते. क्वचित ठिकाणी रस्ते, वहिवाटीच्या कारणामुळे वादविवाद निर्माण होवून न्यायालयीन प्रकरणे उद्भवतात. संबंधित शेतकऱ्यांचे वेळेबरोबरच आर्थिक नुकसान व मानसिक त्रास संभवतो. शेतकऱ्यांनी वरीलप्रमाणे शेत रस्ताविषयक अडचणींचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी आपल्या जिल्हयात कालबध्द मोहिमेची आखणी करण्याात आली आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा, असे प्रशासनाने केले आहे.
अशी आहे मोहिम- शेताकडे जाणारे गाडी रस्ते / पाणंद/ शिवरस्ते /शेतरस्ते/शिवार रस्ते/शेतावर जाण्याचे पायमार्ग अतिक्रमण / अडथळा मुक्ते करण्यादसाठी संबंधित तहसीलदार यांचेकडे २५ जानेवारी, २०२५ पर्यंत अर्ज करावेत. 26 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2025 या कालावधीत तहसीलदार हे प्राप्त अर्जांची स्वतंत्रपणे नोंद घेतील. प्राधान्यक्रमानुसार वर्गवारी करतील व पथक गठीत करणे, नोडल अधिकारी नियुक्त करणे व स्थळ पाहणी करुन आवश्यनकतेनुसार आदेश निर्गमित करतील. 15 फेब्रुवारी ते 31 मार्च 2025 या कालावधीत सर्व गाडी रस्ते / पाणंद/ शिवरस्ते /शेतरस्तेर/शिवाररस्ते /शेतावर जाण्याचे पायमार्ग १०० टक्के अतिक्रमण / अडथळामुक्तब करण्या चे प्रशासनाचे नियोजन आहे.
जिल्ह्यातही शंभर दिवसांचे नियोजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात जानेवारी रोजी बैठक घेऊन या संदर्भात सात सुत्री कार्यक्रम जाहीर केला आहे त्यांच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी देखील जिल्ह्यात शंभर दिवसांचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात महसूल विभागात मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमांच्या आयोजन करण्यात येत असून नागरिकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे.