Problems will be solved : मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या मोहिमेत जिल्ह्यातील रस्ताविषयक अडचणींचा होणार निपटारा
नांदेड| सामान्य नागरिकांचे जीवन सुकर, सहज व प्रशासकीय स्तरावर अडथळा विरहित होण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागाने कंबर कसली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शंभर दिवसातील ७ सुत्री कार्यक्रमाची (7 Day Event) जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असून शेत शिवारातील रस्ते व त्या संदर्भातील अडचणीला या मोहिमेत सोडवण्याचे प्राधान्य देण्यात आले आहे.
सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे (ईज ऑफ लिव्हिंग) यासाठी १०० दिवसांचा ७ कलमी कृती कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Cm Devedra Fadanvis) यांनी जाहिर केला आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात कृती कार्यक्रमाच्यात अमंलबजावणीला सुरुवात करण्यात आली असून या कार्यक्रमांतर्गत सामान्य नागरिकांशी संबंधित असलेली कामे १०० दिवसांची विशेष मोहिम राबवून पुर्ण करण्या्त येणार आहेत.
आपल्या् गावातील गाडी रस्ते, पाणंद, शिवरस्तेे, शेतरस्ते, शिवार रस्...
