महाराष्ट्र राज्य निर्मीती नंतर पहिल्यांदाच महायुतीला ऐतिहासिक बहुमत मिळाले ., महायुती सरकार सामान्य नागरिक, लाडक्या बहिणी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसाचा कृती कार्यक्रम अंतर्गत म शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येत असुन छोट्या-मोठ्या कामासाठी तालुक्याच्याफेऱ्या टाळण्यासाठी प्रशासन आपल्या गावात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरीकांच्या अडीअडचणींचे गावातच निराकरण झाले पाहिजे.बीडीओ याचे कामात लक्ष नाही घरकुल योजनेत लाभार्थ्यांना वेळेत अनुदान द्यावे. सोमवारी कंधार येथे आठवडी बाजार असतो त्यामुळे शक्यतो अधिकारी यांनी कार्यालयात राहावे असे सूचना आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केल्या



शिराढोण ( ता कंधार) येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम शनिवारी ( ५ एप्रिल ) गावात घेण्यात आला .यावेळी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी आश्विनी जगताप, माजी सभापती प्रविण पाटील चिखलीकर, जेष्ठ नेते तुकाराम वारकड, प्रभारी तहसीलदार रेखा चामनर
गटविकास अधिकारी महेश पाटील, वन अधिकारी संदीप शिंदे, तालुका कृषी अधिकारी श्री वाठोरे ,सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक गोविंद नांदेडे, सेवानिवृत्त अति. मुकाअ शिवाजी कपाळे,माजी सभापती बाबुअप्पा मुक्कावार, उपअभियंता सुमीत पाटील, आयोजक साईनाथ कपाळे, दत्तात्रय देवणे, बाबुराव भुरे, मुक्ताराम पांडागळे, नंदकुमार देवणे, सुर्यकांत देवणे, भगवान कपाळे यांच्यासह नागरीक उपस्थित होते.


शासन आपल्या गावात या उपक्रमाचा हेतु म्हणजे गावातील सामान्य नागरीकांच्या अडीअडचणींची गावातच सोडवणुक झाली पाहिजे, शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहचल्या पाहिजे हा आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून “गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार” करण्याची संधी शेतकर्यांना मिळणार आहे, यासाठी पुर्वी लोकसहभागातून ही कामे केली जायची मात्र आता यासाठी शासन अनुदान देणार आहे, पुर्वी घरकुलाचे अनुदान एक लक्ष वीस हजार होते त्यात घर होत नाही म्हण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घरकुल अनुदान दोन लक्ष रुपये करण्याची मागणी केली होती त्याला यश आले.


पण पंचायत समिती मध्ये लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान मिळत नाही काम चांगले करावे एसटी गावात आणा, संजय गांधी निराधार योजनेचा कॅम्प गावात ३० तारखेला होईल तसेच कोपन त्यांना नाही त्यांना ते मिळावे यासाठी प्रयत्न केले जातील यासह अनेक सूचना त्या त्या विभागाला ग्रामस्थांच्या समोरच आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिल्या.

पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित राहून धान्य मिळत नसलेल्या लाभार्थ्यांचे प्रश्न निकाली काढण्याच्या सुचना आमदार चिखलीकर यांनी दिल्या. काही प्रश्न जागीच सुटले यावेळीं उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी शिक्षिका म्हणून पहिली पोस्टिंग होताना तत्कालीन शिक्षणाधिकारी डॉ नांदेडे याची आठवण सांगितली गुरुवर्य यांच्या पुढे आपण आज उपजिल्हाधिकारी म्हणून बोलतोय त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले हे कृतज्ञता पूर्वक नमूद केले
डीवायएसपी अश्विनी जगताप सेवानिवृत्त शिक्षण संचालक , डॉ गोविंद नांदेडे , नायब तहसीलदार चमनर,कृषी अधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले
बिडीओ, कृषी विभागाला तंबी
पंचायत समितीच्या व कृषी विभागाच्या सर्व योजना आॅनलाईन असताना घरकुल व विविध लाभार्थ्यांना संबंधित विभागात फेर्या का माराव्या लागतात? लोकांच्या तक्रारी येऊ देऊ नका गतीमान करा, लाभार्थ्यांना विनाअडथळा योजनांचा लाभ द्या, योजनांमध्ये एजंटगिरी खपवून घेणार नाही अशी तंबी आमदार चिखलीकर यांनी दिली.
उस्माननगर गावात ग्रामीण रुग्णालय
मागील अनेक वर्षांपासून उस्माननगर गावात प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी होत होती, याबाबत आपण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्य मंत्री, यांच्याकडे पाठपुरावा करू असे ग्रामस्थांना आ चिखलीकर यांनी आश्वासित केले


