नांदेड l भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा कृष्णुर ता. नायगाव येथे आशा व गटप्रवर्तक फेडरेशनचे चौथे तालुका अधिवेशन २४ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.


शिक्षणाच्या जननी माता सावित्रीबाई फुले माता जिजाऊ यांच्या प्रतिमेस अभिवादन करून अधिवेशनाची सुरुवात करण्यात आली. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी फेडरेशनच्या अध्यक्षा तथा सीटू राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार ह्या होत्या. आपल्या भाषणात जन सुरक्षा अभियाना विरोधात एकीच्या बळावर लढाई तीव्र करून आपले अधिकार टिकून ठेवावे लागतील असे कॉ. पडलवार यांनी सांगितले. आशा व गटप्रवर्तक अत्यंत तुटपुंज्या मानधनांवर काम करतात त्यांना किमान वेतन देऊन कर्मचारी दर्जा देण्यात यावा असेही मनोगत त्यांनी व्यक्त केले.


अधिवेशनाचे प्रस्ताविक सुशीला इंगळे यांनी केले. अधिवेशनाचे उदघाटन फेडरेशनच्या राज्य उपाध्यक्षा कॉ.शीलाताई ठाकूर यांनी केले.अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून फेडरेशनच्या जिल्हाउपाध्यक्ष सविताताई आढाव जिल्हा कोषाध्यक्ष आम्रपालीताई कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.


कॉ.उज्वला पडलवार यांना क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाने देण्यात आलेला राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केल्यामुळे त्यांचा तालुका कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
अधिवेशनाचे आभार ज्योतीताई भुरे यांनी मानले.
नायगाव तालुका नूतन कमिटी खालील प्रमाणे एक मताने निवडण्यात आली.

तालुकाध्यक्षपदी ज्योतीताई भुरे सचिव पदी मीनाताई तोटावाड कार्याध्यक्ष सुशीला शेळके उपाध्यक्ष कौशल्या घायाडे,रत्नप्रभा गवस, अर्चना पारसेवाड, शिवकांता बैस तर सहसचिव पदी वैशाली मल्हारे, सत्वशीला आमेवार, रंजीता हराळे, आशा आंबदवार, सुंदर बाई बनसोडे यशोदा भद्रे लक्ष्मीबाई चौधरी कोषाध्यक्ष पदी कल्पना लोखंडे यांची एक मतांनी निवडकरण्यात आली. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी नायगाव तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक ताईंनी परिश्रम घेतले.
-कॉ.उज्वला पडलवार,
जिल्हाध्यक्षा : आशा व गटप्रवर्तक फेडरेशन नांदेड जिल्हा.
मो. 9011212123.
दि. 25ऑगस्ट 2025
कृपया बातमी प्रसिद्धीस द्यावी ही नम्र विनंती.


