Naigaon ; सीटू संलग्न आशा गटप्रवर्तक फेडरेशनचे चौथे नायगाव तालुका अधिवेशन संपन्न
नांदेड l भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा कृष्णुर ता. नायगाव येथे आशा व गटप्रवर्तक फेडरेशनचे चौथे तालुका अधिवेशन २४ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
शिक्षणाच्या जननी माता सावित्रीबाई फुले माता जिजाऊ यांच्या प्रतिमेस अभिवादन करून अधिवेशनाची सुरुवात करण्यात आली. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी फेडरेशनच्या अध्यक्षा तथा सीटू राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार ह्या होत्या. आपल्या भाषणात जन सुरक्षा अभियाना विरोधात एकीच्या बळावर लढाई तीव्र करून आपले अधिकार टिकून ठेवावे लागतील असे कॉ. पडलवार यांनी सांगितले. आशा व गटप्रवर्तक अत्यंत तुटपुंज्या मानधनांवर काम करतात त्यांना किमान वेतन देऊन कर्मचारी दर्जा देण्यात यावा असेही मनोगत त्यांनी व्यक्त केले.
अधिवेशनाचे प्रस्ताविक सुशीला इंगळे यांनी केले. अधिवेशनाचे उदघाटन फेडरेशनच्या राज्य उपाध्यक्षा कॉ.शीलाताई ठाकूर यांनी केले.अधिवेशनाला प्रमुख पाहुण...
