नवीन नांदेड l आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवसाची सुरुवात सामाजिक कामांनी झाली असून अंध मुलांच्या शैक्षणिक साहित्य पाहुन कलागुणांना जोपासतात हे चांगली गोष्ट असल्याचे मनपा आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे यांनी वसरणी येथील अंध विद्यालय येथे आयोजित कौठा नांदेड येथील स्टेट बँकेच्या शाखेच्या वतीने आठलक्ष सतरा हजार रूपयांची साहित्य देणगी ऊध्दाटन सोहळा प्रसंगी केले.


ज्योतीबा फुले सेवा ट्रस्ट नांदेड संचलित निवासी अंध विद्यालय वसरणी येथे भारतीय स्टेट बँक नांदेड शाखा कौठा यांच्या सौजन्याने सामाजिक ऊतर दायीत्त्व मंडळ महाराष्ट्र यांच्या माध्यमातून वित्तीय वर्ष 24-25 मधील निधीतून निवासी अंध विद्यालय वसरणी या शाळेत शैक्षणिक भौतिक कार्यालयीन साहित्य दिल्याबद्दल आभार सौहळा व सांस्कृतिक कार्यक्रम 1 एप्रिल रोजी करण्यात आले होते.


यावेळी अध्यक्षस्थानी नामनपा आयुक्त महेश कुमार डोईफोडे, प्रबंधक प्रिया कुमार सारीगला, प्रमुख पाहुणे संत्त्यंद्र आवुलर, संस्थापक व्हि.एस.गुटे, पाकला कालिदासु, रजत कुमार,प्रदिप शहारे, श्रध्दा मोहळ, मनपाचे वित लेखाधिकारी जनार्दन पक्वान्ने, संचालक नागेश गुट्टे, यांच्या सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मनपा आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांनी शाळेतील विद्यार्थी यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती बाबत व विध्यार्थी यांनी वेगवेगळ्या स्पर्धा मध्ये नावलौकिक मिळविला बदल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

शाळेच्या मुख्याध्यापक बाबुराव ईबतवार यांनी सुत्रसंचलन व प्रास्ताविक केले यावेळी भारतीय स्टेट बँक प्रबंधक प्रिया कुमार सारीगला यांनी शाळेतील विद्यार्थी यांच्याशी सुसंवाद साधून बँक यांच्या वतीने शाळेला दिलेल्या साहित्य व संगणक भेट बाबत माहिती दिली.
शाळेतील संगीत शिक्षक पंकज शिरभाते व विद्यार्थी यांनी स्वागत देशभक्ती गीत,भुपाळी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोवाडा, काव्य वाचन व वेगवेगळ्या वाघ वृंद वाजवून उपस्थित मान्यवरांच्ये मने जिंकली.
बँकेच्या वतीने संगणक,सौर ऊर्जा प्रकल्प, तिनं चाकी ई रिक्षा, साहित्य,आलमारी असे आठ लाख सतरा हजार रुपये साहित्य शाळेला भेट दिले. हा सोहळा यशस्वीतेसाठी शाळेतील विशेष शिक्षक संजय पाटील ,रामराव जोजार,सुरेश कोळंबे, भास्कर वसुधा,निकम बलभिम, केंद्रे मनोज कलवले शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.