नांदेड| केळी उत्पादकांची लूट थांबावी यासाठी माजी मुख्यमंत्री,खा अशोकराव चव्हाण यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी शुक्रवारी कृषी विभागाचे अधिकारी,केळी उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी केळी उत्पादक शेतकऱ्याकडून वसूल करण्यात येणारी टप्पाल ,हमाली व बीजकाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या शुल्क कपात रद्ध करण्यात आली आहे. यासमवेतच केळी उत्पादक शेतकरी यांच्या हिताचे निर्णय तसेच नांदेडसह भोकर मतदारसंघात शीतगृह उभारणीचा निर्णय घेण्यात आला आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवार दि. १३ जून रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,कृषी अधीक्षक दत्तकुमार कळसाईत, तालुका कृषी अधिकारी बिऱ्हाडे,केळी उत्पादक शेतकरी निलेश देशमुख,प्रभाकर गव्हाणे ,बालाजी नरवाडे,हणमंत राजेगोरे,बाळासाहेब लहानकर माजी नगराध्यक्ष लायक,ओम पवार ,मारोती पवार व्यापारी माधवअप्पा बिरादार,अन्नवर, राम पाटील,अमोल देशमुख ,इसराईल आदींची उपस्थिती होती. यावेळी केळी उत्पादक शेतकऱ्यांचे व व्यापारी यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. यानंतर सर्वसंमतीने केळी उत्पादक शेतकरी यांच्या हिताचे निर्णय घेतांना व्यापारी यांचेही नुकसान होणार नाही याकडेही पाहण्यात आले आहे.


यावेळी केळी उत्पादक शेतकऱ्याकडून वसूल करण्यात येणारी टप्पाल ,हमाली व बीजकाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या शुल्क कपात रद्ध करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना ११ टक्के पत्ती कपात १० टक्के करण्यात आली,पूर्वी केळीचे घड कॅरेट मध्ये भरण्यापूर्वी इलेक्टोनिक काट्यावर वजन केले जायचे त्यावेळी ७०० ग्राम सूट व १२ टक्के कट्टी होती आता थेट कॅरेट मध्ये केळीची फणी टाकून वजन व १२ टक्के कट्टी रद्ध करण्यात आली आहे. या निर्णयाचे केळी उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केले असून खा. चव्हाण व प्रशासनाचे आभार मानले आहे.


नांदेडसह भोकर मतदारसंघात शीतगृह
भोकर मतदार संघात सिंचनाची मोठी सोय असल्याने मोठ्या संख्येने शेतकरी केळीचे पीक घेतात. यासाठी मतदारसंघातील अर्धापूर, भोकर,मुदखेड तसेच जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या नांदेड येथे शीतगृह उभारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. या सर्व निर्णयाची माहिती शेतकऱ्यांनी खा. चव्हाण यांना दिली यावेळी आगामी काळात केळी उत्पादकांना चांगली बाजारपेठ उपलब्द व्हावी तसेच केळीची निर्यात वाढावी यासाठी आपला प्रयत्न राहील अशी ग्वाही खा. अशोकराव चव्हाण यांनी शेतकऱ्यांना दिली आहे.


