cold storage : केळी उत्पादकांची लूट थांबणार नांदेडसह भोकर मतदारसंघात शीतगृहाचा निर्णय
नांदेड| केळी उत्पादकांची लूट थांबावी यासाठी माजी मुख्यमंत्री,खा अशोकराव चव्हाण यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी शुक्रवारी कृषी विभागाचे अधिकारी,केळी उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी केळी उत्पादक शेतकऱ्याकडून वसूल करण्यात येणारी टप्पाल ,हमाली व बीजकाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या शुल्क कपात रद्ध करण्यात आली आहे. यासमवेतच केळी उत्पादक शेतकरी यांच्या हिताचे निर्णय तसेच नांदेडसह भोकर मतदारसंघात शीतगृह उभारणीचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवार दि. १३ जून रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,कृषी अधीक्षक दत्तकुमार कळसाईत, तालुका कृषी अधिकारी बिऱ्हाडे,केळी उत्पादक शेतकरी निलेश देशमुख,प्रभाकर गव्हाणे ,बालाजी नरवाडे,हणमंत राजेगोरे,बाळासाहेब लहानकर माजी नगराध्यक्ष ल...
