नांदेड l ‘नानकसाई फाऊंडेशनच्या संत नामदेव घुमान सद्भावना यात्रेच्या माध्यमातून पंढरीनाथ बोकारे मराठी आणि पंजाबी भाषा आणि संस्कृतीचा उत्तम अनुबंध जोडत आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डा.जगदीश कदम यांनी नरसी नामदेव येथे आयोजित संत नामदेव सद्भावना परिषदेत केले.


महाराष्ट्रातील भाविकांना अध्यात्म, पर्यटन, इतिहास आणि संस्कृतीचा अद्वितीय अनुभव देणारी नानक साई फाऊंडेशन ची नांदेड (हजुर साहिब) ते अमृतसर व्हाया नरसी नामदेव हि ११ वी “घुमान यात्रा” २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पंजाब हरियाणा दिल्ली दौऱ्यावर जाणार आहे.


काल नरसी नामदेव (हिंगोली) येथे नामदेव मंदिरात पूजा आरती करून यात्रेचा आरंभ करण्यात आला. दरम्यान ज्येष्ठ साहित्यिक प्रा डॉ जगदीश कदम यांच्या अध्यक्षतेखाली संत नामदेव सद्भावना परिषद झाली. महानुभाव पंथाचे अभ्यासक डॉ प्रा संजय जगताप, नरसी नामदेव चे सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक घारगे, मंदिर संस्थान चे कार्यवाह हभप श्री रमेश मगर महराज नरसीकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधवराव पटणे, नांदेड जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष संभाजी राव धुळगंडे, प्रा सुदामराव बोखारे, प्रा उत्तमराव बोकारे, प्रा रामदास बोकारे, गोविंद हंबर्डे आणि नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांची प्रमुख उपस्थिती होती.


कुठलाही धर्म मानवतावादी असतो. तो समाजासमाजाला जोडण्याचे काम करीत असतो. मराठी संत नामदेव यांनी मराठीची पताका थेट पंजाबपर्यंत नेली.त्यांच्या कार्याची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी नानकसाई फौंडेशन दरवर्षी “ना नफा ना तोटा” या पध्दतीने घुमानयात्रा आयोजित करते ही बाब ऐतिहासिक आहे. दहा दिवसांची घुमानयात्रा हा एक अविस्मरणीय अनुभव असतो.

आजवर या यात्रेत अनेक मान्यवर सहभागी झालेले आहेत. शासनाने अशा उपक्रमांची नोंद घेऊन प्रोत्साहन द्यायला हवे असे ज्येष्ठ साहित्यिक प्रा डा.जगदीश कदम म्हणाले. संत नामदेव सद्भावना परिषदेचे संयोजक कवी शिवाजी कऱ्हाळे यांनी प्रास्तविक करून परिषदे च्या आयोजनाची भूमिका सांगितली. महानुभाव पंथाचे अभ्यासक डॉ प्रा संजय जगताप यांनी नामदेवा रचिला पाया तुका झाला कळस याच महत्व समजाऊन सांगितले. सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक घारगे यांनी नानक साई फाऊंडेशन च्या उपक्रमाचं गोड कौतुक केले.मार्गदर्शन केले.
शेवटी घुमान साहित्य सभेचे अध्यक्ष डॉ गजानन देवकर यांनी आभार प्रदर्शन केले. परिषदेला माधवराव सादलापुरे,शंकरराव कुबडे , कर सल्लागार ज्ञानेश्वरराव बोखारे,डॉ गजानन देवकर, पुंडलिक बेलकर ,स.महेंद्रसिंग पैदल ,धनंजय उमरीकर ,एम टी कदम ,दिलीप अंगुलवार ,चंद्रकांत पवार,अशोक कंकरे ,भास्कर दीक्षित,अशोक रामगिरवार ,सचिन शिनगारे,गंगाधर वडेनवार ,सुरेश रापते,कृष्णा जोशी ,बबन घोडगे,सविता हंबर्डे ,लक्ष्मण जक्कावाड,जयमाला मामडे,सुधाकर पिलगुंडे, उत्तमराव देशमुख ,पंडितराव सारंग ,जिजाबाई सारंग यांच्या सह मोठ्या संख्येने निमंत्रित प्रतिनिधी उपस्थित होते.


