Marathi-Punjabi : मराठी-पंजाबी भाषा व संस्कृतीचा अनुबंध म्हणजे ‘संत नामदेव‘ घुमान यात्रा : ज्येष्ठ साहित्यिक प्रा डा.जगदीश कदम यांचे प्रतिपादन
नांदेड l 'नानकसाई फाऊंडेशनच्या संत नामदेव घुमान सद्भावना यात्रेच्या माध्यमातून पंढरीनाथ बोकारे मराठी आणि पंजाबी भाषा आणि संस्कृतीचा उत्तम अनुबंध जोडत आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डा.जगदीश कदम यांनी नरसी नामदेव येथे आयोजित संत नामदेव सद्भावना परिषदेत केले.
महाराष्ट्रातील भाविकांना अध्यात्म, पर्यटन, इतिहास आणि संस्कृतीचा अद्वितीय अनुभव देणारी नानक साई फाऊंडेशन ची नांदेड (हजुर साहिब) ते अमृतसर व्हाया नरसी नामदेव हि ११ वी "घुमान यात्रा" २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पंजाब हरियाणा दिल्ली दौऱ्यावर जाणार आहे.
काल नरसी नामदेव (हिंगोली) येथे नामदेव मंदिरात पूजा आरती करून यात्रेचा आरंभ करण्यात आला. दरम्यान ज्येष्ठ साहित्यिक प्रा डॉ जगदीश कदम यांच्या अध्यक्षतेखाली संत नामदेव सद्भावना परिषद झाली. महानुभाव पंथाचे अभ्यासक डॉ प्रा संजय जगताप, नरसी नामद...
