हिमायतनगर,अनिल मादसवार| महाराष्ट्रातील नांदेडच्या हदगाव तालुक्यात मौजे पिंपळगाव येथील भव्य श्री दत्त मंदिर आहे. पिंपळगाव दत्त संस्थानचे परमपूज्य गोवत्स तपस्वी बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांच्या संकल्पनेतून मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यापासून म्हणजेच दिनांक 6 ते 13 या काळात भव्य शिवमहापुराण कथा सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, गेल्या वर्षभरापासून तयारी सुरु आहे. दरम्यान शनिवारी श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या संचालक मंडळींनी येथे भेट देऊन कथा स्थळाची पाहणी केली असून, या धर्म कार्यात हिमायतनगर वासियांचा सहभाग असावा म्हणून दिनांक 17 फेब्रुवारी रोज सायंकाळी ठीक 7 वाजता मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.


दिनांक दिनांक 6 मार्च ते 13 मार्च दरम्यान होणाऱ्या पिंपळगाव येथील भव्य शिवमहापुराण कथा सोहळ्यात अनंत श्रीविभुषित श्रीमज्जगद्गुरू द्वाराचार्य श्री अग्रपिठाधिश्वर तथा मलूक पिठाधिश्वर स्वामी श्री राजेंद्रदास देवाचार्यजी महाराज श्रीसेवा वृंदावन धाम उत्तरप्रदेश यांच्या मधुर वणीतून भव्य शिवमहापुराण कथा आणि १०८ कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.

या धार्मिक सत्संग सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असून, शनिवार दिनांक १५ रोजी हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या संचालक मंडळींनी पिंपळगाव दत्त संस्थानाला भेट देऊन तपस्वी बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांचे आशीर्वाद घेतले. हा भव्यदिव्य सोहळा जवळपास १०० एकर परिसरात होणार असून, यासाठी सुरु असलेल्या विशाल कथा पेंडॉल, यज्ञकुंड, नामसंकीर्तन सोहळा, भोजनकक्ष, निवास व्यवस्था व अन्य नियोजन स्थळाची पाहणी करून माहिती जाणून घेतली आहे.

हा भव्यदिव्य सोहळा लाखोंच्या संख्येने येणारे भाविक भक्त व देशभरातून शेकडोच्या संख्येत येणारी जगतगुरु, महामंडलेश्वर, शिवाचार्य, पिठाधिश्वर, संस्थानिक व संतांच्या परंपरेतील दिव्य विभूती दर्शन देण्यासाठी येणार आहेत. तसेच साधू संत महंत मंडळी आणि राजकीय मंत्र्याच्या आगमनाने हा सत्संग सोहळा दिव्य अनुभूती देणारा ठरणार आहे. या भव्य शिवमहापुराण कथे संदर्भाच्या सेवा व नियोजन संदर्भाने दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक सात वाजता हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान येथे पिंपळगाव संस्थानचे प.पू.गोवत्स तपस्वी बालयोगी व्यंकटस्वामी महाराज उपस्थित राहणार असून, भाविक भक्तांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी शहरातील महिला – पुरुष भाविक भक्त सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन मंदिराचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी केले आहे.
