श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| विधानसभेचा बिगुल वाजला २० नोव्हेंबरला मतदान होणार व २३ नोव्हेंबरला निवडणुकीचे निकाल लागणार आहे. मात्र या विधानसभेच्या बिगुलामध्ये किनवट-माहूर मतदार संघात सद्यातरी सन्नाटा पसरलेला आहे. महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदारांना संधी मिळणार की त्यांना डावलणार? तर महायुतीतर्फे विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देणार की डावलणार? की नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार? याकडे किनवट-माहूर विधानसभा मतदार संघाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून निवडणूक आयोगाने सुध्दा निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. त्याअनुषंगाने आता किनवट-माहूर मतदार संघात कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष वेधल्या जात आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या (शरद पवार) माजी आमदार प्रदीप नाईक यांचा २०१९ मध्ये महायुतीच्या मदतीने विद्यमान आ.भिमराव केराम यांनी पराभव करून माजी आ. प्रदीप नाईक यांचा १५ वर्षाचा अभेद्य गड खेचून विजयश्री मिळविला होता. पाच वर्षाच्या कालखंडामध्ये माजी आ.प्रदीप नाईक यांनी पराभव झाल्यानंतर अनेक काळ मतदारसंघ सोडला होता परंतु मागील १ वर्षापासून पायाला भिंगरी बांधून संपूर्ण मतदार संघात आपला जनसंपर्क वाढविला आहे.
किनवट-माहूर मतदार संघावर माजी आ.प्रदीप नाईक यांचेसह शिवसेनेचे ( उबाठा ) क्षेञ प्रमुख ज्योतिबा खराटे यांचीही तेवढीच मोठी पकड असल्याने व हिंगोली लोकसभेत मोठ्या मताधिक्याने शिवसेना( उबाठा )चे खा.नागेश पाटील आष्टीकर हे विजयी झाल्याने खराटे यांनी जोरदार तयारी सुरू केली असून त्यांचाही जनसंपर्क मोठ्या प्रमाणात असून खराटेच्या नांवाची सर्वञ चर्चा आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी उमेदवारी कोणाला देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर किनवट-माहूर मतदार संघातील भाजपात गटातटाचे राजकारण निर्माण झाले असल्याने विद्यमान आ.केराम,अशोक सूर्यवंशी,संध्याताई राठोड यांचेसह अनेक पदाधीकारी उमेदवारीसाठी ईच्छुक असल्याने पक्षश्रेष्ठीची डोके दुःखी वाढली असून उमेदवारीवर शिक्का मोर्फत झाल्यानंतर बंडखोरी होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.त्यातच मागील लोकसभेच्या निवडणुकीत आ.केराम यांनी मा.खा.हेमंत पाटील यांचा प्रखर विरोध करुण लोकसभेची जागा भाजपाच्या पदरात पाडून घेण्यासाठी मोठी खेळी खेळून सदरील जागा हेमंत पाटील यांच्याकडून खेचून घेतली. त्यानंतर राजकिय खेळी खेळत बाबुराव कदम कोहळीकर यांना देण्यात आली.
त्यामुळे खा.हेमंत पाटील यांना ही जागा गमावून बॅकफुटवर जावे लागले.ऐवढेच नाहीतर महायुतीतील व भाजपा पक्षातील अंर्तगत वादामुळे लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला पराभवासामोर जावे लागले. त्यामुळे महायुतीतील विकोपाला गेलेला वाद अद्याप कायम असून विद्यमान आमदाराच्या प्रत्येक कार्यक्रमावर शिंदे सेनेने बहिष्कार दाखवून आगामी विधानसभा निवडणुकीत आ.केराम यांना उमेदवारी न मिळण्यासाठी महायुतीतील घटकपक्षातील वरीष्ठासह स्थानिक पदाधीकारी मोठ्या कसोठीने कामाला लागली असल्याची माहिती राजकिय जाणकारांकडून व शिंदे शिवसेनेच्या प्रमुख पदाधीकार्याच्या चर्चेतून समोर येत आहे. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीची उमेदवारी नक्की कोणाला मिळणार हे सध्या गुलदस्त्यात आहे.आज घडीला किनवट-माहूर विधानसभा मतदार संघात सनाटा पसरलेला दिसत असलातरी पक्षांकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा झाल्यानंतरच राजकीय चित्र स्पष्ट होऊन निवडणुकीला रंगत चढणार आहे.
हट्टी व बावळट पदाधीकार्यांमुळे आ.भिमराव केराम यांना विधानसभा जड…?
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये माहूर-किनवट मतदार संघातील भाजपातील गटबाजीचा आणि मतभेदाचा महायुतीला चांगलाच फटका बसल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतरही भाजपामधील अंतर्गत वाद थांबण्याचे नाव घेत नाही.२०१९ च्या निवडणुकीत माजी आ.प्रदीप नाईक हे पराभूत झाल्यावर त्यांना सोडून भाजपात प्रवेश केलेल्या काही माहूर शहरातील भानगडबाज कार्यकर्त्यांने तर भाजपाचा प्रमुख असल्यागत पक्षात भानगडी लावून पक्षाची पार मातीच केल्याचे जेष्ठ कार्यकर्त्याकडून सांगण्यात येत आहे. माहूर शहरातील भाजपा पक्षातील काही हट्टी व बावळट पदाधीकार्यांमुळे आ.भिमराव केराम यांना ही विधानसभा निवडणूक जड जाणार असल्याचे जाणकारांकडून चर्चा होत आहे.